AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2021: बांग्लादेश-श्रीलंका सामन्यात बाचाबाची करणाऱ्या खेळाडूंवर कारवाई, माजी भारतीय खेळाडूने सुनावली शिक्षा

रविवारी भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी श्रीलंका आणि बांग्लादेश या संघातही सामना झाला. यावेळी श्रीलंका संघाने विजय मिळवला खरा पण सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये अतिशय गरमागरमीचे वातावरण पाहायला मिळालं.

T20 World Cup 2021: बांग्लादेश-श्रीलंका सामन्यात बाचाबाची करणाऱ्या खेळाडूंवर कारवाई, माजी भारतीय खेळाडूने सुनावली शिक्षा
श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश
| Edited By: | Updated on: Oct 25, 2021 | 5:32 PM
Share

T20 World Cup 2021: रविवारी टी20 विश्वचषकात (T20 World Cup 2021) झालेल्या बांग्लादेश आणि श्रीलंका सामन्यामध्ये दोन खेळाडूंमध्ये जबरदस्त बाचाबची झाली. बांग्लादेशची फलंदाजी सुरु असताना पहिलाच विकेट पडला असता श्रीलंकेचा गोलंदाज एल कुमारा (L Kumara) याने आक्रमकता दाखवत थेट फलंदाज लिटन दास (Liton Das) याच्या अंगावर गेला. दरम्यान या सर्वानंतर आता आयसीसीने आचार संहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोन्ही खेळाडूंची मॅच फि देखील कापण्यात आली आहे.

यावेळी एल कुमारा याच्या मॅच फीमध्ये 25 टक्के तर लिटन दासच्या मॅच फिमध्ये 15 टक्के कपात करण्यात आली आहे. यावेळी मॅच रेफऱी म्हणून भारताचे माजी गोलंदाज जवागल श्रीनाथ हे काम पाहत असल्याने त्यांनीच ही शिक्षा सुनावली आहे. यावेळी आयसीसी आचार संहितेची धारा 2 . 5 नुसार बाद झाल्यानंतर कोणतीही आक्रमक किंवा चूकीची प्रतिक्रिया देण्याबाबत ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

नेमकं घडलं काय?

शारजाहमध्ये सुरु असलेल्या बांग्लादेश विरुद्ध श्रीलंका सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली. यावेळी सलामीवीर लिटन दास आणि नईम यांनी अप्रतिम सुरुवात केली. पण लिटन याची विकेट जाताच मैदानात असं काही घडलं की मैदानात अगदी वातावरणचं बदलंल. लिटन दासची विकेट घेतल्यानंतर श्रीलंकेचा गोलंदाज लाहिरु कुमारा अगदी जोशामध्ये लिटनच्या अंगावर गेला. त्याचा आक्रमक अंदाज पाहून सर्वच खेळाडू सोडवा सोडवी करायला आले. नॉन स्ट्राईकर नईमही यावेळी मध्ये पडला. तर लिटननेही जाता जाता बॅट समोर आणत कुमाराला खुन्नस दिली.

अखेर श्रीलंका विजयी

अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात बांग्लादेशवर श्रीलंका संघाने 5 विकेटने विजय मिळवला. बांग्लादेशने प्रथम फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 171 धावा केल्या. ज्यानंतर श्रीलंका संघाची सुरुवात खराब झाली पण अखेर चरित असालंकाने 49 चेंडूत नाबाद 80 आणि भानुका राजपक्षाने 53 धावांची खेळी तरत 7 चेंडू ठेवून सामना संघाला जिंकवून दिला.

इतर बातम्या

India vs Pakistan : पाकिस्तानच्या विजयाचा शिल्पकार असणाऱ्या शाहीनचं, शाहीद आफ्रिदीशी नातं काय?

इंग्लंड संघाची ताकद वाढणार, सर्वात बलाढ्य खेळाडू संघात परतणार

India vs Pakistan T20 World Cup VIDEO | रोहित शर्माच्या खेळीवरुन पत्रकाराचा खोचक प्रश्न, विराटने आधी रोखून पाहिलं, मग मान खाली घालून हसत सुटला

(In Bangaldesh vs Sri lanka match lahiru kumara and liton das fined for breaching icc code of conduct)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.