IPL New Team Auction 2021: 7 हजार कोटींना संघ घेणारे संजीव गोएन्का आहेत तरी कोण?, याआधीही विकत घेतली होती IPL Team

बऱ्याच प्रतिक्षेनंतर आयपीएलमध्ये नव्याने दोन संघ सामिल झाले आहेत. यामध्ये अहमदाबाद आणि लखनऊ या दोन संघाचा समावेश असून यातील लखनऊ संघ हा सर्वात महागडा संघ आहे. ज्याची मालकी आरपी संजीव गोएन्का ग्रुपकडे आहे.

IPL New Team Auction 2021: 7 हजार कोटींना संघ घेणारे संजीव गोएन्का आहेत तरी कोण?, याआधीही विकत घेतली होती IPL Team
आरपी संजीव गोएन्का ग्रुपने विकत घेतला लखनौचा संघ
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 9:18 PM

दुबई : एकीकडे टी20 विश्वचषकाची धमाल सुरु असताना आता आय़पीएलच्या पुढील हंगामाबाबत अर्थात IPL 2022 बद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे. आगामी आयपीएलमध्ये अर्थात IPL 2022 मध्ये 8 नव्हे तर 10 संघ खेळणार असल्याचं यापूर्वीच समोर आलं होतं. त्यानुसार दोन नव्या संघांची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी लखनौ आणि अहमदाबाद या दोन संघाची एन्ट्री झाली आहे. या दोन संघासाठी अनेक दिग्गज व्यावसायिक आणि बड्या हस्तींमध्ये बोली लावण्यात आल्या आहेत. यापैकी RPSG अर्थात आरपी संजीव गोएन्का ग्रुप्स आणि सीवीसी कॅपिटल कंपनीने  लिलाव जिंकला आहे. गोएन्का ग्रुपने लखनौचा संघ 7 हजार 90 कोटी रुपये तर सीवीसी कॅपिटल कंपनीने अहमदाबाद संघ 5 हजार 625 कोटींना लिलावात विकत घेतला आहे.

दरम्यान आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागडा संघ लखनऊचा ठरला आहे. तब्बल 7 हजार कोटींच्या घरात किंमत असणाऱ्या या संघाचे मालक असणारे आरपीएसजी ग्रुपचे मालक संजीव गोएन्का यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. ज्याठिकाणी अदानी, मॅंचेस्टर सारख्या कंपन्यांना 5 हजार कोटीच्या पुढे बोली लावता आली नाही. त्याठिकाणी संजीव यांनी तब्बल 7 हजार कोटींच्या घरात संघ विकत घेतला आहे. विशेष म्हणजे याआधीही त्यांनी एका आयपीएल संघाच मालकीहक्क बजावला आहे.

कोण आहेत संजीव गोएन्का?

संजीव गोएन्का हे भारतीय मल्टीनॅशनल कंपनी असणाऱ्या आरपी संजीव गोएन्का ग्रुपचे संस्थापक मालक आहेत. गोएन्का ग्रुपचं मूळ हेडकॉव्टर कोलकाता येथे असून 2011 साली ही कंपनी उदयास आली आहे. विविध क्षेत्रात गोएन्का ग्रुप असून यामध्ये प्रामुख्याने इलेक्ट्रिक युटेलिटी अर्थात वीज पुरवठा कंपनी, रिटेलिंग, आय़टी सर्व्हिसेस, मीडियासह स्पोर्टस आणि शिक्षण अशा क्षेत्रातही गोएन्का ग्रुप पुढे आहे. यात सारेगामा इंडिया लिमिटेड, टू यम, नेचर्स बास्केट, वुडलँड हॉस्पीटल या काही प्रसिद्ध कंपन्या आरपीएसजी ग्रुप अंडर आहेत.

पुण्याचा संघही होता आरपीएसजी ग्रुपकडे

RPSG ग्रुपने याआधीही आयपीएलमध्ये किस्मत आजमवली आहे. पुण्याचा संघ गोएन्का ग्रुपकडे होता ज्याचे कर्णधार म्हणून एमएस धोनी आणि स्टीव स्मिथ अशा दिग्गजानी काम पाहिलं आहे. 2017 साली तर आयपीएलच्या फायनलमध्येही हा संघ गेला होता. पण पुढे जाऊन हा संघ खास कामगिरी करु शकला नाही. आता लखनऊच्या संघासह गोएन्का ग्रुपने आयपीएलमध्ये पुनरागमन केलं आहे. यावेळी संजीव यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं, ‘आयपीएलमध्ये पुनरागमन करताना मी खूप उत्साही आहे.ही तर फक्त सुरुवात आहे. आम्हाला चांगला संघ तयार करुन एक चांगलं प्रदर्शन करायचं आहे.’

इतर बातम्या

IPL New Team Auction 2021: आयपीएलमध्ये लखनौ आणि अहमदाबाद संघाची एन्ट्री, आरपी संजीव गोएन्का ग्रुपसह सीवीसी कॅपिटल कंपनीने जिंकला लिलाव

India vs Pakistan : पाकिस्तानच्या विजयाचा शिल्पकार असणाऱ्या शाहीनचं, शाहीद आफ्रिदीशी नातं काय?

इंग्लंड संघाची ताकद वाढणार, सर्वात बलाढ्य खेळाडू संघात परतणार

(In IPL 2022  RP Sanjiv Goenka Group gets Lucknow IPL franchise they are also ex owners of team pune supergiants know who is sanjiv goenka)

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.