T20 World Cup मधील बांग्लादेशचं आव्हान कायम, ओमानवर 26 धावांनी विजय

| Updated on: Oct 20, 2021 | 12:22 AM

विश्वचषकातील पहिल्या सामन्यात बांग्लादेश संघाला स्कॉटलंडने 6 धावांनी पराभूत केलं होतं. पण ओमानला मात्र 26 धावांनी मात देत बांग्लादेशने स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे.

T20 World Cup मधील बांग्लादेशचं आव्हान कायम, ओमानवर 26 धावांनी विजय
ओमान विरुद्ध बांग्लादेश सामन्यातील एक क्षण
Follow us on

T20 World Cup 2021 : बांग्लादेश संघाने अखेरकार स्पर्धेतील पहिलं यश मिळवलं आहे. दोन्ही वॉर्मअप सामने आणि स्कॉटलंड संघाकडून पहिल्या सामन्यात पराभवानंतर अखेर मंगळवारी (19 ऑक्टोबर) बांग्लादेश संघाने ओमानला 26 धावांनी पराभूत करत पहिला विजय मिळवला आहे. सामन्यात बांग्लादेशने प्रथम फलंदाजी करत 153 धावा केल्या. बदल्यात ओमानचा संघ मात्र 127 धावाच करु शकल्याने बांग्लादेश विजयी झाला. बांग्लादेशचा गोलंदाज मुस्तिफिजूर रेहमानने 36 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तर शाकिब अल हसनने 28 धावांच्या बदल्यात 3 विकेट्स मिळवल्या. मोहम्मद सैफुद्दीन आणि मेहदी हसननेही 1-1 विकेट घेतला.

बांग्लादेशसाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. कारण आजचा सामना पराभूत होताच. त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं असतं. पण आज गोलंदाजाच्या अप्रतिम कामगिरीमुळे त्यांनी विजय मिळवत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे. ओमानकडून ओपनर जतिंदर सिंगने 40 धावा केल्या तर कश्यप प्रजापतीने 21 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पण इतर फलंदाजाना खास कामगिरी करता न आल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला.

शाकिब विजयाचे हिरो

या सामन्यात बांग्लादेशच्या फलंदाजीवेळी मोहम्मद नईमने 64 आणि शाकिब अल हसनने 42 धावा करत तिसऱ्या विकेटसाठी 80 रनांची भागिदारी केली. या दोघांच्या खेळीमुळेच बांग्लादेशने या महत्त्वपूर्ण सामन्यात 20 ओव्हरमध्ये 153 रन केले. त्यानंतर गोलंदाजीवेळीही शाकिब अल हसनने 28 धावांच्या बदल्यात 3 विकेट्स घेतल्या. ज्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

हे ही वाचा

अक्षर पटेल मुख्य संघातून राखीव खेळाडूंमध्ये जाण्यामागे हार्दीक पंड्या, वाचा नेमकं प्रकरण काय?

T20 World Cup साठी भारतीय संघाची रणनीती ठरली, अशी असेल टीम इंडिया, काय म्हणाले रवी शास्त्री?

T20 World Cup 2021: 33 शतकं लगावली, विश्व-चषकही जिंकवून दिला, आता फॉर्म नसल्यामुळे स्वत:च अंतिम 11 मधून बाहेर पडणार

(In t20 world Cup 2021 match between Oman vs Bangladesh Bangladesh beat Oman by 26 runs)