AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2021: 33 शतकं लगावली, विश्व-चषकही जिंकवून दिला, आता फॉर्म नसल्यामुळे स्वत:च अंतिम 11 मधून बाहेर पडणार

भारताच्या विश्वचषकाच्या सामन्यांना सुरुवात होण्यापूर्वी भारत सराव सामना खेळत आहे. नुकताच भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला सराव सामना पार पडला. ज्यामध्ये भारताने इंग्लंडवर 7 विकेट्सनी विजय मिळवला.

T20 World Cup 2021: 33 शतकं लगावली, विश्व-चषकही जिंकवून दिला, आता फॉर्म नसल्यामुळे स्वत:च अंतिम 11 मधून बाहेर पडणार
भारत विरुद्ध इंग्लंड (प्रातिनिधीक फोटो)
| Edited By: | Updated on: Oct 19, 2021 | 10:51 PM
Share

T20 World Cup 2021: अनेकदा खेळाडू फॉर्ममध्ये नसल्यास त्यांना संघ व्यवस्थापन बाहेरचा रस्ता दाखवतं. पण एखादा खेळाडू ज्याने अनेक वर्ष संघाची सेवा केली असेल अनेक शतकांसह अगदी दोन वर्षापूर्वीच विश्वचषक जिंकवून दिला असल्यास त्याला संघाबाहेर ठेवणं तसं अवघडचं. पण अशावेळी त्या खेळाडूने स्वत:चा फॉर्म पाहता स्वत:हून संघाबाहेर राहणं म्हणजे योग्य आणि मोठ्या मनाचा निर्णय़ म्हणावा लागेल. तर आम्ही सांगत असलेला हा निर्णय इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन (Eoin Morgan) याने घेतला आहे.

नुकताच भारत आणि इंग्लंड यांच्यात सराव सामना पार पडला. ज्यामध्ये इंग्लंडता कर्णधार म्हणून मॉर्गनच्या जागी जोस बटलर याने संघाची धुरा सांभाळली. या सामन्यात भारताने इंग्लंडचा धुव्वा उडवत 7 विकेट्सनी दमदार विजय मिळवला. दरम्यान या सामन्यात मॉर्गनने स्वत:ला बाहेर ठेवले असले तरी तो न्यूझीलंड विरुद्धच्या वॉर्म अप सामन्यात मैदानात उतरणार आहे. पण विश्वचषकाच्या मुख्य सामन्यात काय करणार? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. विशेष म्हणजे नुकत्याच

अंतिम 11 मधून बाहेर पडणं ही एक पर्याय-मॉर्गन

इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनने स्काय स्पोर्ट्सशी बातचीत केली असताना त्याने सांगितलं,‘स्वत:ला संघाबाहेर ठेवणं एक पर्याय आहे. मी संघाला टी20 वर्ल्ड कप जिंकताना पाहू इच्छितो. त्यामुळे यामध्ये मी स्वत: संकट बनणार नाही. मी खराब फॉर्ममध्ये असलो तरी मी कर्णधारपद चांगलं भूषवू शकतो. पण माझा फॉर्म खराब असल्यास मी स्वत:ला नक्कीच बाहेर करेन.’ विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या आय़पीएलमध्ये मॉर्गन कर्णधार असलेला केकेआरचा संघ फायनलपर्यंत पोहोचला खरा. पण मॉर्गनने संपूर्ण मालिकेत 17 सान्यात 11.08 च्या सरासरीने 133 धावांच केल्या.

पहिल्या सराव सामन्यात भारत विजयी

पहिल्याच सराव सामन्यात भारताने इंग्लंडला 7 विकेट्सने मात दिली. या सामन्यात भारताने सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली. त्यानंतर इंग्लंडने मात्र दमदार फलंदाजी करत 188 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. यामध्ये बेयरस्टोच्या 49, लियामच्या 30 धावांसह मोईन अलीने अखेरच्या काही षटकात 20 चेंडूत केलेल्या नाबाद 43 धावांनी धावसंख्या वाढवण्यात मोठं योगदान दिलं. ज्यामुळे संघाचा स्कोर भलामोठा झाला. भारताकडून गोलंदाजीत शमीने उत्तम गोलंदाजी करत महत्त्वाच्या 3 विकेट्स घेतल्या. तर राहुल चाहरने आणि बुमराहने प्रत्येकी 1 विकेट घेतली. ज्यामुळे भारताला विजयासाठी 189 धावांचे आव्हान होते.

या तगड्या आव्हाना पाठलाग करण्यासाठी आलेले भारतीय फलंदाज सुरुवातीपासून चांगल्या लयीत होते. रोहित शर्मा नसल्याने केएल राहुल सोबत इशान किशन सलामीला आला. यावेळी 82 धावापर्यंत एकही विकेट गेला नव्हता. तोवर राहुलने 51 धावा करत अर्धशतकही लगावलं. राहुल अर्धशतक होताच बाद झाला. ज्यानंतर कोहलीही 11 धावा करुन बाद झाला. पण इशानने मात्र धमाकेदार फलंदाजी सुरु ठेवली पण अखेर 70 धावा झाल्या असताना त्याने विश्रांती घेण्यासाठी स्वत:हून माघार घेतली. त्यानंतर सूर्यकुमार 8 धावा करुन बाद झाला. ज्यानंतर ऋषभ पंतने (नाबाद 29) आणि हार्दीकने (नाबाद 12) एक ओव्हर राखून भारताला विजय मिळवून दिला.

हे ही वाचा

अक्षर पटेल मुख्य संघातून राखीव खेळाडूंमध्ये जाण्यामागे हार्दीक पंड्या, वाचा नेमकं प्रकरण काय?

T20 World Cup साठी भारतीय संघाची रणनीती ठरली, अशी असेल टीम इंडिया, काय म्हणाले रवी शास्त्री?

…नाहीतर पेट्रोल पंपावर काम करत असतो, हार्दीक पंड्याने सांगितली व्यथा

(England Captain eoin morgan to drop himself if his poor form continues says himself)

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.