IND vs AFG: वनडे मालिका जिंकल्यानंतर कर्णधार गिलने व्यक्त केलं मत, 330 दिल्या असत्या तरी आम्ही…

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसरा वनडे सामना पार पडला. हा सामना भारताने 170 धावांनी जिंकला. तसेच तीन सामन्यांची वनडे मालिका 2-0 ने जिंकली. या विजयानंतर कर्णधार शुबमन गिलने मनोगत व्यक्त केलं आहे.

IND vs AFG: वनडे मालिका जिंकल्यानंतर कर्णधार गिलने व्यक्त केलं मत, 330 दिल्या असत्या तरी आम्ही...
IND vs AFG: वनडे मालिका जिंकल्यानंतर कर्णधार गिलने व्यक्त केलं मत, 330 दिल्या असत्या तरी आम्ही...
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Jun 17, 2026 | 10:11 PM

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दुसरा वनडे सामना भारताने खिशात घातला. दुसऱ्या वनडे सामन्यात भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. भारतीय संघाने 49.5 षटकात सर्व गडी गमवून 402 धावा केल्या. तसेच विजयासाठी 403 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान गाठताना अफगाणिस्तानचा संघ 232 धावांवरच गारद झाला. भारताने हा सामना 170 धावांनी जिंकली. वनडे क्रिकेटमधील भारताने अफगाणिस्तानवर मिळवलेला हा दुसरा मोठा विजय आहे. यापूर्वी 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला 275 धावांनी पराभूत केलं होतं. त्यांनंतर आता 170 धावांनी विजय मिळवत भारताने विक्रम रचला आहे. या विजयानंतर भारताने तीन सामन्यांची वनडे मालिका 2-0 ने जिंकली आहे.

शुबमन गिल म्हणाला की…

अफगाणिस्तानविरूद्धच्या या सामन्यात कर्णधार शुबमन गिलने दीड शतकी खेळी केली. शुबमन गिलने 110 चेंडूत 22 चौकार आणि 2 षटकार मारत 154 धावा केल्या. शुबमन गिल तिसऱ्या षटकात मैदानात उतरला होता आणि 43व्या षटकापर्यंत फलंदाजी केली. यावेळी त्याला दुखापतीलाही सामोरं जावं लागलं. या खेळीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. दुखापतीबाबत शुबमन गिल म्हणाला की, ‘थोडं दुखतंय, खूप पेटके येत आहेत. 40-45 षटकं फलंदाजी केली आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागांत पेटके आले. सध्या खेळपट्टी खूप चांगल्या स्थितीत आहे, चेंडू नेमका मला हवा तिथेच जातोय. या मालिकेसाठी माझं एक लक्ष्य होतं की मला 40-45 षटकांपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहायचं आहे. मी ते केलं, पण मला माहित होतं की 440-450 धावांचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून मला माझे फटके मारत राहावे लागतील.’

शुबमन गिल म्हणाला की, आमच्या वाटेला प्रथम गोलंदाजी आली असती तरी आम्ही 300 च्या वरील धावा आरामात गाठल्या असत्या. शुबमन गिलने या स्थितीबाबत सांगितलं की, ‘जरी आम्ही प्रथम गोलंदाजी केली असती तरी खेळपट्टी अशीच होती. जर 320-330 धावांचा पाठलाग करायचा असता, तर ते आमच्यासाठी एक चांगलं आव्हान ठरलं असतं. सर्व गोलंदाज सध्या खूप चांगल्या स्थितीत आहेत, ज्या प्रकारे आमचे वेगवान गोलंदाज या खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करत आहेत ते खूप समाधानकारक आहे.’

Follow Us