AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AFG T20: अफगाणिस्तानचा संघ टी20 मालिकेसाठी जाहीर, क्रिकेट बोर्डाने स्पष्टच सांगितलं की…

भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. टी20 वर्ल्डकप 2024 च्या दृष्टीने ही मालिका खूप महत्त्वाची आहे. या मालिकेसाठी अफगाणिस्तान संघाने खेळाडूंची निवड केली आहे. कोण कोण खेळाडू या चमूत असतील ते जाणून घ्या.

IND vs AFG T20: अफगाणिस्तानचा संघ टी20 मालिकेसाठी जाहीर, क्रिकेट बोर्डाने स्पष्टच सांगितलं की...
| Updated on: Jan 06, 2024 | 6:10 PM
Share

मुंबई : दक्षिण अफ्रिका दौऱ्यानंतर क्रीडाप्रेमींना वेध लागले आहे ते अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेचे..या मालिकेबाबत क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या मालिकेतून रोहित शर्मा आणि विराट कोहली कमबॅक करणार का? असाही प्रश्न आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता ताणली गेली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी या मालिकेत खेळतील अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा या मालिकेत खेळताना दिसले तर आश्चर्य वाटायला नको. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात पाच टी20 सामने झाले आहेत. यापैकी 4 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर एका सामन्याचा निकाला लागलेला नाही. उभय देशांमध्ये ही पहिलीच टी20 मालिका आहे. यापूर्वी दोन्ही संघ फक्त आयसीसी स्पर्धांमध्ये आमनेसामने आले आहेत. त्यामुळे ही मालिका दोन्ही संघांसाठी तितकीच महत्त्वाची आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने 19 खेळाडूंचीही मालिकेसाठी निवड केली आहे. टी20 सामन्यात राशीद खान याचं पुनरागमन झालं आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मिरवाईस अश्रफ यांनी सांगितलं की, “आम्हाला तीन सामन्यांच्या मालिकेसाठी भारताच्या पहिल्या दौऱ्यावर जाताना आनंद होत आहे. भारत ही जगातील अव्वल रँकिंग असलेली संघ आहे. त्यांच्याविरुद्ध तीन सामन्यांच्या टी20 मालिका खेळण्याचा आनंद आहे. अफगाणिस्तानचा संघ यापुढे अंडरडॉग राहिलेले नाही. अलीकडच्या उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आम्ही भारताविरुद्ध अत्यंत स्पर्धात्मक मालिकेसाठी उत्सुक आहोत.” विशेष म्हणजे राशीद खानची या मालिकेसाठी निवड झाली असली तर तो एकही सामना खेळणार नाही. नुकतीच त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया पार पडली होती.

भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी अफगाणिस्तानचा संघ: इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इक्रम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्ला झाझाई, रहमत शाह, नजीबुल्लाह झदरन, मोहम्मद नबी, करीम जनात, अजमउल्ला ओमरझाई, शराफुद्दीन अश्रफ , मुजीब उर रहमान, फजल हक फारुकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदिन नायब आणि राशीद खान.

  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान, 11 जानेवारी 2024, संध्याकाळी 7 वाजता
  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान, 14 जानेवारी 2024, संध्याकाळी 7 वाजता
  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान, 17 जानेवारी 2024, संध्याकाळी 7 वाजता
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी.
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....