AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : फक्त 25 चेंडूत मॅच फिरली, तिथेच ऑस्ट्रेलियाचा ‘गेम ओव्हर’, हातून असा निसटला सामना

IND vs AUS : टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिला वनडे सामना जिंकला आहे. 3 मॅचच्या सीरीजमध्ये पहिली वनडे जिंकण्यासाठी टीम इंडियाला 25 चेंडू पुरेसे ठरले. या 25 चेंडूत मॅच पलटली, ऑस्ट्रेलियन टीम उद्धवस्त झाली.

IND vs AUS : फक्त 25 चेंडूत मॅच फिरली, तिथेच ऑस्ट्रेलियाचा 'गेम ओव्हर', हातून असा निसटला सामना
team india Image Credit source: BCCI
| Updated on: Mar 18, 2023 | 8:44 AM
Share

IND vs AUS 1st ODI : ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरीजमध्ये टीम इंडियासाठी अपेक्षित सुरुवात झाली आहे. काल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पहिला वनडे सामना झाला. टीम इंडियाने ही मॅच आरामात जिंकली. केएल राहुलची झुंजार इनिंग आणि रवींद्र जाडेजाच्या ऑलराऊंडर प्रदर्शनाच्या बळावर टीम इंडियाने 5 विकेट राखून विजय मिळवला. टीम इंडियाच्या या विजयाची पायाभरणी आधीच झाली होती. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजने 25 चेंडूत ऑस्ट्रेलियाला उद्धवस्त केलं होतं.

टीम इंडियाचा कॅप्टन हार्दिक पंड्याने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी स्वीकारली. टीम इंडियाने या मॅचमध्ये 4 पेस बॉलर खेळवले. भारतीय वेगवान बॉलर्सनी आपला जलवा दाखवला. ऑस्ट्रेलियाची इनिंग 188 धावांवर संपवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पंड्या, शमी आणि सिराजने मिळून 10 पैकी 7 विकेट घेतले.

शमीने केली सुरुवात

ऑस्ट्रेलियाच्या डावात सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत टीम इंडियाच्या वेगवान बॉलर्सची दहशत दिसून आली. खासकरुन शमी आणि सिराजने ऑस्ट्रेलियाची वाट लावली. मोहम्मद शमीने 28 वी ओव्हर टाकली. या ओव्हरमधील चौथा चेंडू निर्धाव होता. पाचव्या चेंडूवर विकेट मिळाला. सहावा चेंडू निर्धाव होता. त्यानंतर शमीने पुढच्या ओव्हरमध्ये कॅमरुन ग्रीनचा विकेट घेतला. एकही धाव दिली नाही. शमीने सलग 15 चेंडूवर एकही धाव न देता 3 विकेट घेतले. त्याच्या गोलंदाजीच पृथ्थकरण (3/17) असं होतं.

सिराजच तुफान

त्यानंतर सिराजने (3/29) हे काम केलं. इनिंगच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये सिराजने पहिली विकेट घेतली. त्यानंतर 34 व्या ओव्हरमध्ये त्याने जोरदार पुनरागमन केलं. 36 व्या ओव्हरचे पहिले तीन चेंडू निर्धाव होते. चौथ्या चेंडूवर शेवटचा विकेट काढला. शमी आणि सिराजने सलग 25 चेंडूवर ऑस्ट्रेलियाला जखडून ठेवलं. या 25 चेंडूत एकही रन्स न देता 5 विकेट काढले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव 188 धावात संपला.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!