Suryakumar Yadav याचं झुंजार अर्धशतक, टीकाकारांना चोख उत्तर

India vs Australia 1st Odi Suryakumar Yadav | सूर्यकुमार यादव याने निर्णायक क्षणी केएल राहुल याची साथ देत टीम इंडियाचा डाव सावरण्यात मदत केली. सूर्याने यासह अर्धशतकही पूर्ण केलं.

Suryakumar Yadav याचं झुंजार अर्धशतक, टीकाकारांना चोख उत्तर
Follow us
| Updated on: Sep 23, 2023 | 2:26 AM

मोहाली | टीम इंडियाचा आघाडीचा फलंदाज सूर्यकुमार यादव याने अनेक महिन्यांनंतर एकदिवसीय अर्धशतक ठोकलं आहे. सूर्यकुमारने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात झुंजार अर्धशतकी खेळी केलीय. सूर्याने 47 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. सूर्याने 47 बॉलमध्ये 106 च्या स्ट्राईक रेटने हे अर्धशतक पूर्ण केलं. सूर्याने या दरम्यान 5 चौकार आणि 1 खणखणीत सिक्स खेचला. सूर्याच्या वनडे कारकीर्दीतील हे तिसरं अर्धशतक ठरलं. सूर्याला टी 20 प्रमाणे वनडेत त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता येत नव्हती. मात्र त्याने हे अर्धशतक ठोकत जोरदार कमबॅक केलंय.

सूर्याला गेल्या काही सामन्यांमध्ये काही खास करता आलं नाही. आशिया कपमध्येही सूर्याने निराशाच केली. त्यामुळे सूर्यावर भरभरून टीका करण्यात येत होती. मात्र सूर्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध झुंजार अर्धशतक करत टीकाकारांची तोंडं बंद केली. सूर्याला अर्धशतकानंतर टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरण्याची संधी होती. मात्र सूर्याला अर्धशतकानंतर काहीच करता आलं नाही. सूर्या आऊट झाला. सूर्याने 49 बॉलमध्ये 5 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने 50 धावांवर आऊट झाला.

केएलसोबत निर्णायक भागीदारी

दरम्यान सूर्याने केएलसोबत पाचव्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली. शुबमन गिल-ऋतुराज गायकवाड या दोघांनी 142 धावांची सलामी भागीदारी केली. मात्र त्यानंतर ऋतुराज, श्रेयस, शुबमन आणि ईशान झटपट आऊट झाले. त्यामुळे टीम इंडियाची 142-0 वरुन 4 बाद 185 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध सूर्या चमकला

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी.

ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन) डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लाबुशेन, कॅमरुन ग्रीन, जोस इंग्लिस (विकेटकीपर), मार्क्स स्टोयनिस, एम शॉर्ट, सिन एबोट आणि एडम झॅम्पा.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.