IND vs AUS 3rd T20 Live Streaming : भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 सामना पाहा फुकटात, जाणून घ्या सविस्तर
India vs Australia T20 Live Streaming Channel : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तिसरा टी-20 ,सामना आज संध्याकाळी होणार आहे. आजचा सामना कांगारूंसाठी करो या मरो असणार आहे. हा सामना कुठे, किती वाजता होणार आणि फ्रीमध्ये कुठे पाहायला मिळणार जाणून घ्या.
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आज तिसरा टी- 20 सामना होणार आहे. भारताने हा सामना जिंकला तर भारत संपूर्ण मालिका खिशात घालणार आहे. तर कांगारूंच्या संघासाठी हा सामना करो या मरो असणार आहे. कारण पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाला चारीमुंड्या चीत केलं आहे. आजचा सामना किती वाजता आणि कुठे होणार आहे त्यासोबतच तो फ्रीमध्ये कुठे पाहता येणार जाणून घ्या.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा T20 सामना किती वाजता होणार? भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज (28 नोव्हेंबर) संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे. त्याआधी 6.30 वाजता टॉस होईल.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा T20 सामना कुठे खेळला जाईल? भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा सामना गुवाहाटी येथील बारसापारा स्टेडियमवर होणार आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसर्या T20 सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे आहे? Jio Cinema अॅपवर ऑनलाइन पाहू शकता. तुम्हाला मोबाईलवर सामना फुकटात पाहता येणार आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा T20 सामना तुम्ही कोणत्या टीव्ही चॅनलवर पाहू शकता? भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा सामना स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर पाहू शकता. त्यासोबतच डीडी फ्री डीशवरही तुम्हाला फुकटात हा सामना पाहता येणार आहे.
आस्ट्रेलिया संघाने आजच्या सामन्यासाठी नवीन संघ उतरवला आहे. पहिल्या दोन सामन्याती 6 खेळाडूंना आराम दिला आहे. वर्ल्ड कप खेळलेल्या सहा खेळाडूंचा यामध्ये समावेश असून त्या खेळाडूंना घरी पाठवलं आहे.
आजच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ:-
मॅथ्यू वेड (C), जेसन बेहरेनडॉर्फ, टिम डेव्हिड, बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, ख्रिस ग्रीन, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, बेन मॅकडरमॉट, जोश फिलिप, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, केन रिचर्डसन