
अभिषेक शर्मा हा टी20 क्रिकेटमधील सध्या फॉर्मात असलेला फलंदाज आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने वेगाने धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या टी20 मालिकेत अभिषेक शर्माची बॅट हवी तशी चालताना दिसत नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील आतापर्यंत झालेल्या चार सामन्यापैकी तीन सामन्यात फेल गेला. अभिषेक शर्माने मेलबर्न टी20 सामन्यात फक्त अर्धशतकी खेळी केली होती. त्यामुळे त्याच्याकडून चौथ्या टी20 सामन्यात अपेक्षा वाढली होती. पण त्याने 21 चेंडूत 28 धावा केल्या आणि बाद झाला. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट फक्त 133 चा होता. अभिषेकची बॅटिंग शैली पाहता हा स्ट्राईक रेट खूपच कमी आहे. ऑस्ट्रेलियाने अभिषेक शर्माच्या फलंदाजीचा बऱ्यापैकी अभ्यास केलेला दिसत आहे. कारण त्याला आक्रमक फलंदाजी करण्यास जराही स्कोप दिला जात नाही. त्यामुळे पॉवर प्लेच्या पाच षटकात अभिषेकने फक्त एकच चौकार मारला.
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सामना करताना अभिषेक शर्मा अडखळत असल्याचं दिसून येत आहे. ऑस्ट्रेलियान गोलंदाजांना त्याची कमकुवत बाजू दिसून आली असावी. कॅराराच्या ओव्हल मैदानात अभिषेक शर्माला कांगारूंनी कसा फसवला ते जाणून घेऊयात. अभिषेक शर्माला शरीराला लागून त्यांनी वारंवार बाउंसर्स टाकले. त्यामुळे त्याला आक्रमक खेळी करण्यास अडचण आली. धावा होत नसल्याने अभिषेक शर्माने वैतागून आक्रमक खेळायला गेला आणि विकेट फेकली असं दिसत आहे. सातव्या षटक टाकण्यासाठी एडम झाम्पा आला होता. त्याने पहिलाच चेंडू फ्लाइट टाकला आणि त्यावर त्याने षटकार मारला. पण त्यानंतर अभिषेक शर्मा फसला. अभिषेक आणखी मोठा फटका मारण्याच्या नादात लाँग ऑनवर टिम डेविडच्या हातात सोपा झेल दिला.
अभिषेक शर्माने टी20 मालिकेत आतापर्यंत 140 धावा केल्या आहेत. पण त्याचा स्ट्राईक रेट हा 159 इतका झाला आहे. इतकंच काय तर तीन सामन्यात फेल गेला आहे. अभिषेक शर्माने होबार्टमध्ये 25, कॅनबरामध्ये 19 आणि आता 28 धावा करून बाद झाला. या तिन्ही वेळेस त्याने चुकीचा फटका मारला आणि विकेट गमवून बसला. एकंदरीत अभिषेक शर्माला ऑस्ट्रेलियातील खेळपट्टीच्या हिशेबाने फलंदाजीत बदल करणं आवश्यक आहे. अन्यथा त्याला विदेशी खेळपट्ट्यांवर धावा करण्यास अडचणीचं जाईल.