Ind vs Aus 1st Test : David Warner च्या एका कृतीने टीम इंडियाला बसेल मोठा झटका, त्याने प्लानिंगच केलय तसं, VIDEO

Ind vs Aus 1st Test : डेविड वॉर्नर क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये जबरदस्त खेळाडू आहे. आपल्या बॅटिंगच्या जोरावर कुठल्याही सामन्याच चित्र पालटण्याची त्याची क्षमता आहे. त्यामुळे डेविड वॉर्नर ऑस्ट्रेलियन टीममधील सर्वात धोकादायक फलंदाज आहे.

Ind vs Aus 1st Test : David Warner च्या एका कृतीने टीम इंडियाला बसेल मोठा झटका, त्याने प्लानिंगच केलय तसं, VIDEO
David-Warner Image Credit source: Getty Images
Follow us
| Updated on: Feb 09, 2023 | 8:22 AM

Ind vs Aus 1st Test : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये आजपासून टेस्ट सीरीजला सुरुवात होत आहे. नागपूर येथे पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सीरीजमध्ये ऑस्ट्रेलियाने आधीच भारताच्या फिरकी गोलंदाजीचा धसका घेतलाय. बॅटिंगमध्ये ओपनर डेविड वॉर्नरवर त्यांची मुख्य भिस्त असेल. डेविड वॉर्नर क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये जबरदस्त खेळाडू आहे. आपल्या बॅटिंगच्या जोरावर कुठल्याही सामन्याच चित्र पालटण्याची त्याची क्षमता आहे. त्यामुळे डेविड वॉर्नर ऑस्ट्रेलियन टीममधील सर्वात धोकादायक फलंदाज आहे. डेविड वॉर्नरचा दिवस असेल, तर त्याला रोखणं कुठल्याही गोलंदाजाला जमणार नाही. हे याआधी सुद्धा दिसून आलय. त्यामुळे डेविड वॉर्नरला लवकरात लवकर बाद करण्याचा टीम इंडियाच्या गोलंदाजांचा प्रयत्न असेल. कारण तो खेळपट्टीवर टिकला, तर ऑस्ट्रेलियाच्या धावगतीला लगाम घालणं कठीण होऊन बसेल.

डेविड वॉर्नरचे वेगळे डावपेच

डेविड वॉर्नर मूळात लेफ्टी बॅट्समन आहे. त्याने आतापर्यंत लेफ्टी बॅटिंग केलीय. पण नागपूर कसोटीत तुम्हाला हे चित्र बदलेलं दिसू शकतं. नागपूर कसोटीसाठी डेविड वॉर्नरने वेगळे डावपेच आखलेत. त्याची झलक नेट प्रॅक्टिसमध्ये दिसून आली.

हेच चित्र नागपूर कसोटीत दिसेल

ऑस्ट्रेलियन मीडियाच्या रिपोर्ट्नुसार डेविड वॉर्नर रायटी सुद्धा बॅटिंग करु शकतो. रविंद्र जाडेजा आणि अक्षर पटेल या टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांविरोधात डेविड वॉर्नर रायटी बॅटिंग करु शकतो, असं ऑस्ट्रेलियन मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलय. अलीकडेच नेट प्रॅक्टिसमध्ये डेविड वॉर्नरने रायटी बॅटिंगची झलक दाखवली होती. हेच चित्र नागपूर कसोटीत पहायला मिळेल.

वॉर्नरने टीममधल्या सहकाऱ्यांना काय सांगितलय?

काही भारतीय बॉलर्स विरोधात मी रायटी बॅटिंग करेन, असं डेविड वॉर्नरने टीममधील सहकाऱ्यांना सांगितल. फॉक्स स्पोर्ट्सने हे वृत्त दिलय. रविंद्र जाडेजा आणि अक्षर पटेल या दोन लेफ्टी स्पिन गोलंदाजांचा सामना करताना वॉर्नर रायटी बॅटिंग करु शकतो. ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये किती लेफ्टी?

परिस्थिती पाहून डेविड वॉर्नर रायटी खेळायचं की, लेफ्टी ते ठरवेल. नागपूरच्या विकेटवर लेफ्टी बॅट्समनने तितक्या सहजतेने बॅटिंग करता येणार नाही, असं म्हटलं जातय. फिरकी गोलंदाजांना मदत मिळावी, यासाठी भारताने नागपूरच्या विकेटशी छेडछाड केल्याचा आरोप ऑस्ट्रेलियन मीडियाने केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये एकूण 5 लेफ्टी बॅट्समन आहेत.

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.