
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना 6 गडी राखून जिंकला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 187 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान भारताने 5 गडी गमवून पूर्ण केलं. भारताने ऑस्ट्रेलियाने दिलेलं आव्हान 5 गडी राखून 18.3 षटकात पूर्ण केलं. विजयी धावांचा पाठलाग करताना भारताने आक्रमक सुरुवात केली. अभिषेक शर्माने चांगली सुरुवात केली. त्याने 16 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकार मारत 25 धावांची खेळी केली. पहिल्या विकेटसाठी अभिषेक शर्माने गिलसोबत 33 धावांची भागीदारी केली. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि शुबमन गिल यांच्यात 28 धावांची भागीदारी झाली. शुबमन गिल 12 चेंड़ूत 1 चौकाराच्या मदतीने 15 धावा केल्या. गिलची विकेट पडल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माकडून अपेक्षा होत्या. पण सूर्यकुमार यादव फटका मारताना चुकला आमि 24 धावांवर तंबूत परतावं लागलं.
अक्षर पटेल पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. आक्रमक फटकेबाजी करून संघावरील दडपण कमी करेल अशी अपेक्षा होती. अक्षर पटेल पण काही खास करू शकला नाही. त्याने 12 चेंडूत 1 चौकार मारत 17 धावा केल्या. पण तिलक वर्मासोबत 22 चेंडूत 35 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर आणि तिलक वर्मा यांच्यातील आक्रमक भागीदारी संघासाठी महत्त्वाची ठरली. या दोघांनी 19 चेंडूत 34 धावा केल्या. मात्र एक चुकीचा फटका आणि तिलक वर्माचा डाव 29 धावांवर संपला.
वॉशिंग्टनची खेळी भारतासाठी खूपच महत्त्वाची ठरली. टिम डेविडचा झेल सोडल्याने टीम इंडियाला 54 धावांचा फटका बसला होता. मात्र फलंदाजीत त्याने त्याची वसुली केली. त्याने 24 चेंडूत 53 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे टीम इंडियाला विजय मिळवता आला. वॉशिंग्टन सुंदर आणि जितेश शर्मा यांनी 25 चेंडूत नाबाद 43 धावांची भागीदारी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
ऑस्ट्रेलियाकडून सीन अबोट हा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने 3.3 षटकात 56 धावा दिल्या. त्याला एकही विकेट घेता आली नाही. तर नाथन एलिसने 4 षटकात 36 धावा देत 3 गडी बाद केले. झेव्हियर्स बार्लेट आणि मार्कस स्टोयनिस यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.या विजयासह मालिकेत तीन सामन्यानंतर 1-1 अशी बरोबरी झाली. त्यामुळे उर्वरित दोन्ही सामन्यात मालिका विजयासाठी जिंकणं भाग आहे. पहिला सामना पावसामुळे झाला नव्हता.