AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS 4th Test : ऑस्ट्रेलियाने जिंकला टॉस, टीम इंडियाच्या प्लेइंग XI मध्ये एक बदल,

India vs Australia, Ahmedabad Test: भारत आणि ऑस्ट्रेलियामधला चौथा कसोटी सामना खास आहे. PM मोदी ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांसोबत मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित आहेत.

IND vs AUS 4th Test : ऑस्ट्रेलियाने जिंकला टॉस, टीम इंडियाच्या प्लेइंग XI मध्ये एक बदल,
team india
| Updated on: Mar 09, 2023 | 9:33 AM
Share

IND vs AUS 4th Test : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर सीरीजमधला चौथा कसोटी सामना थोड्याच वेळात सुरु होईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही टेस्ट मॅच होत आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचा उत्साह वाढवण्यासाठी दोन्ही देशाचे पंतप्रधान मैदानावर उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी टॉसच्यावेळी मैदानावर दिसतील. भारत-ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव्ह स्मिथने टॉस जिंकला आहे. त्याने पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय.

टीम इंडियाला जिंकावच लागेल ऑस्ट्रेलियन टीमने आधीच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताला WTC च्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी चौथा कसोटी सामना जिंकावाच लागेल.भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या मैत्रीला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून एका खास नाण्याचा वापर करण्यात आला.

टीम इंडियात एकमेव बदल

चौथ्या कसोटीत मोहम्मद सिराजला विश्रांती देऊन त्याच्याजागी मोहम्मद शमीचा प्लेइंग 11 मध्ये समावेश करण्यात आलाय. तिसऱ्या कसोटीत शमीला विश्रांती दिली होती.

अशी आहे दोन्ही टीम्सची प्लेइंग XI

भारत : रोहित शर्मा ( कॅप्टन), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, उमेश यादव

ऑस्ट्रेलिया: ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ (कॅप्टन), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरुन ग्रीन, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नाथन लायन, टॉड मर्फी, मॅथ्यू कुहनेमन ते दोघे ऑस्ट्रेलियाला भारी पडले

अहमदाबाद टेस्ट मॅचमध्ये खेळपट्टीबद्दल उत्सुक्ता आहे. नागपूर, दिल्ली आणि इंदोर कसोटीत टर्निंग विकेट्स होत्या. हे तिन्ही कसोटी सामने तीन दिवसात निकाली निघाले. आता अहमदाबादच्या चौथ्या कसोटी सामन्यात खेळपट्टी कशी असेल? त्याची उत्सुकता आहे. स्पोर्टिंग विकेट असेल, तर गोलंदाजी बरोबर फलंदाजीलाही वाव मिळेल. मागच्या तीन कसोटी सामन्यात रविंद्र जाडेजा आणि रविचंद्रन अश्विनची फिरकी गोलंदाजी ऑस्ट्रेलियाला भारी पडली आहे.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.