
भारतीय महिला संघाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत अप्रतिम सुरुवात केली. भारताने श्रीलंका आणि पाकिस्तानला पराभूत करत सलग 2 सामने जिंकले. मात्र टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयी हॅटट्रिक करण्यात अपयशी ठरली. दक्षिण आफ्रिकेने भारताचा विजयरथ रोखला. दक्षिण आफ्रिकेने यासह टीम इंडिया विरुद्ध वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील सलग तिसरा विजय मिळवला. त्यामुळे टीम इंडियाचा पुढील सामन्यात विजयी ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न असणार आहे.
टीम इंडिया या मोहिमेतील आपला चौथा सामना हा गतविजेत्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे. हरमनप्रीत कौर भारताचं नेतृत्व करणार आहे. तर एलिसा हीली ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. हा सामना कुठे आणि कधी होणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.
टीम इंडिया वूमन्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स सामना रविवारी 12 ऑक्टोबरला होणार आहे.
टीम इंडिया वूमन्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स सामना विशाखापट्टणममधील डॉक्टर वाय राजशेखरा रेड्डी एसीए व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.
टीम इंडिया वूमन्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होईल. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
टीम इंडिया वूमन्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तसेच सामन्यातील प्रत्येक अपडेट्स https://www.tv9marathi.com या आमच्या वेबसाईटवरील लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेता येतील.
टीम इंडिया वूमन्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स सामना मोबाईल-लॅपटॉपवर जिओ हॉटस्टार एपद्वारे पाहायला मिळेल.
दरम्यान दोन्ही संघांनी आतपर्यंत प्रत्येकी 3-3 सामने खेळले आहेत. भारताने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर एका सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. तर ऑस्ट्रेलियाने 2 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर 1 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.