AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team india : Sanju Samson ला पुन्हा दिला झटका, BCCI कडून अशी अपेक्षा नव्हती

IND vs AUS ODI : WTC फायनल आणि वनडे वर्ल्ड कपचा विचार करता बीसीसीआय कुठलाही धोका पत्करणार नाही. आयपीएल 2023 मध्ये त्याच्या खेळण्याबद्दल अनिश्चितता कायम आहे.

Team india : Sanju Samson ला पुन्हा दिला झटका, BCCI कडून अशी अपेक्षा नव्हती
sanju samson
| Updated on: Mar 14, 2023 | 8:52 AM
Share

IND vs AUS ODI : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरु असतानाच टीम इंडियाला एक मोठा झटका बसला. टीम इंडियाचा मधल्याफळीतील फलंदाज श्रेयस अय्यरची पाठदुखीची दुखापत बळावली. त्यामुळे तो सीरीजमधील शेवटच्या कसोटी सामन्यात फलंदाजी करु शकला नाही. टेस्ट नंतर आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन सामन्यांची वनडे सीरीज होणार आहे. श्रेयस अय्यर या वनडे सीरीजमधूनही बाहेर पडला आहे. बीसीसीआय त्याच्या बाबतीत कुठलाही धोका पत्करणार नाही.

कसोटी सामना सुरु असताना श्रेयस अय्यरने तिसऱ्यादिवशी लोअर बॅक पेनच्या दुखापतीची तक्रार केली. स्कॅनमधून त्याची दुखापत बळावल्याच स्पष्ट झालं. त्यामुळे श्रेयस वनडे सीरीजमध्ये खेळणार नाहीय.

दुसऱ्या खेळाडूच नाव अपेक्षित होतं

त्याच्याजागी बीसीसीआयने दुसऱ्या खेळाडूच नाव जाहीर करणं अपेक्षित होतं. श्रेयस अय्यर खेळणार नाहीय, त्यामुळे त्याच्याजागी संजू सॅमसनची निवड अपेक्षित होती. संजू सॅमसनचा वनडे फॉर्मेटमध्ये एव्हरेज 66 आहे. पण शिव सुंदर दास यांच्या अध्यक्षतेखालील बीसीसीआयच्या निवड समितीने श्रेयसच्या जागी दुसऱ्या खेळाडूच नाव जाहीर केलेलं नाही.

पहिला वनडे सामना कधी

ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरीज 17 मार्चपासून चेन्नईमध्ये सुरु होणार आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, दुखापतग्रस्त फलंदाजाच्या जागी बीसीसीआय दुसऱ्या खेळाडूच नाव जाहीर करणार नाही. मंगळवारी मुंबईत वनडे स्क्वॉड जमा होणार आहे,. 17 मार्चला होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यात हार्दिक पंड्या नेतृत्व करणार आहे. विशाखापट्टनम येथे होणाऱ्या दुसऱ्या वनडे मॅचपासून कॅप्टन रोहित शर्मा उपलब्ध असेल.

बीसीसीआय धोका नाही पत्करणार

पाठदुखीमुळेच श्रेयस अय्यर श्रीलंके विरुद्धची वनडे मालिका आणि नागपूरमधल्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकला नाही. NCA मध्ये 15 दिवसांची रिहॅब प्रोसेस झाल्यानंतर श्रेयसचा थेट दुसऱ्या दिल्ली कसोटी सामन्यासाठी टीममध्ये समावेश करण्यात आला. आता पुन्हा दुखापत बळावलीय. ज्याचा फटका टीम आणि त्याला दोघांना बसणार आहे. WTC फायनल आणि वनडे वर्ल्ड कपचा विचार करता बीसीसीआय कुठलाही धोका पत्करणार नाही. आयपीएल 2023 मध्ये त्याच्या खेळण्याबद्दल अनिश्चितता कायम आहे.

Follow Us
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा, शिंदे, चाकणकर अन्..
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आला समोर
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला... बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्
मोठी बातमी! प्रवाशांचा श्वास गुदमरला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्रेस
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
Omraje Nimbaklar | ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याने धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच केलं मोठं विधान, पुन्हा...
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री
CM Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीला
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत...
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत... बड्या नेत्याने एक एक करत सगळंच सांगितलं
एकच खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री
खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री; त्याला सगळंच... डोकं चक्रावणारा खुलासा
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन नेत्यांमध्ये रुसवारुसवी... कारण अत्यंत चकित करणार
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची ऑफर?