AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs IND : लाजिरवाणी बाब आहे…, विराट-रोहित ऑस्ट्रेलियाला पोहचण्याआधी पॅट काय म्हणाला?

Pat Cummins On Rohit Sharma and Virat Kohli : पॅट कमिन्स याला दुखापतीमुळे टीम इंडिया विरूद्धच्या मालिकेला मुकावं लागलंय. अशात पॅटने एकदिवसीय मालिकेला काही दिवस बाकी असताना रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गजांबाबत भाष्य केलं आहे.

AUS vs IND : लाजिरवाणी बाब आहे..., विराट-रोहित ऑस्ट्रेलियाला पोहचण्याआधी पॅट काय म्हणाला?
Pat Cummins and Rohit SharmaImage Credit source: GETTY IMAGES
| Updated on: Oct 15, 2025 | 7:59 PM
Share

टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं (India Tour Of Australia 2025) काउंटडाऊन सुरु झालं आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकदिवसीय आणि टी 20i मालिका खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेत 3 तर टी 20i मालिकेत एकूण 5 टी 20i सामने होणार आहेत. एकदिवसीय मालिकेला 19 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी टीम इंडिया 15 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचं ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन होणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये या दोघांना पाहायला मिळणार असल्याने उत्साह आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स याने प्रतिक्रिया दिली आहे.

पॅटने रोहित आणि विराटच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचा उल्लेख करत त्यांच्या कामगिरीचा पाढा वाचला. तसेच पॅटने निराशाही व्यक्त केली. रोहित आणि विराट हे दोघेही गेल्या 15 वर्षांपासून टीम इंडियाचा भाग आहेत. या एकदिवसीय मालिकेच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट चाहत्यांना रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना पाहायची संधी मिळेल. क्रिकेट चाहत्यांसाठी या दोघांना ऑस्ट्रेलियात पाहण्याची शेवटची संधी असू शकते, असं पॅटने म्हटलं.

पॅटचं निराश असण्याचं कारण काय?

पॅट या मालिकेत खेळता येणार नसल्याने निराश आहे. “टीम इंडिया विरूद्धच्या वनडे आणि टी 20i मालिकेला मुकणं ही लाजिरवाणी बाब आहे. या सामन्यांसाठी स्टेडियममध्ये चाहत्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असेल. ऑस्ट्रेलियात आधीपासूनच उत्साह आहे”, असं पॅटने म्हटलं.

“त्यामुळे जेव्हा तुम्हाला सामन्याला मुकावं लागतं तेव्हा हे निराशाजनक असतं. अशा मोठ्या मालिकेतून बाहेर असणं अवघड असतं”, अशा शब्दात पॅटने आपण टीम इंडिया विरुद्ध खेळू शकणार नसल्याची खंत व्यक्त केली. पॅटला दुखापतीमुळे टीम इंडिया विरूद्ध खेळता येणार नाहीय.

पॅटचा मिचेल मार्शला सल्ला, काय सांगितलं?

पॅटला दुखापतीमुळे खेळता येणार नसल्याने मिचेल मार्श वनडे आणि टी 20i या दोन्ही मालिकेत ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. पॅटने या निमित्ताने मिचेल मार्श याला सल्ला दिला आहे. ऑस्ट्रेलियाने वनडे सीरिज जिंकायली हवी. मात्र त्या युवा खेळाडूंना संधी द्यायला हवी जे वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळले नव्हते”, असं पॅटने म्हटलं.

“त्यांना आपल्यासह खेळायची संधी द्याला हवी हे आपलं लक्ष्य आहे. ते कशी कामगिरी करतात हे पाहायला हवं. या खेळाडूंना संधी देऊन आगामी वनडे वर्ल्ड कप 2027 स्पर्धेत कोणते 15 जण खेळणार याची चाचपणी करायला हवी”, असंही पॅटने म्हटलं.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या