INDvsAUS : भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेआधी टीमला धक्का, मॅचविनर प्लेअर बाहेर

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. सीरिजमधील पहिल्या सामन्याचं आयोजन हे नागपुरातील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये करण्यात आलंय.

INDvsAUS : भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेआधी टीमला धक्का, मॅचविनर प्लेअर बाहेर
Follow us
| Updated on: Feb 04, 2023 | 6:16 PM

नागपूर : टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेसाठी सज्ज आहेत. दोन्ही संघ कसून सराव करत आहेत. या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील सलामीचा सामना नागपूरमध्ये विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियासाठी ही सीरिज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र त्याआधी एक वाईट बातमी समोर आली आहे. स्टार आणि मॅचविनर खेळाडू मालिकेतील पहिल्या सामन्याला मुकू शकतो. कॅप्टननेच तशी भीती व्यक्त केली आहे.

ऑस्ट्रेलियाचा युवा अष्टपैलू खेळाडू कॅमरुन ग्रीन नागपूर कसोटीत खेळणार की नाही, याबाबत संभ्रम आहे. कॅप्टन पॅट कमिन्सने याबाबतची माहिती दिली. तसेच तो खेळण्यास असमर्थ असल्याची हिंट दिली. ग्रीनला दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये अंगठीला दुखापत लागली होती. तेव्हापासून तो मैदानातून बाहेर आहे. कॅमरुनचे मेडिकल रिपोर्ट अपेक्षित आहेत. त्यामुळे त्याच्यासाठी आणि टीमसाठी पुढील 3 दिवस हे निर्णायक असणार आहेत.

मात्र ग्रीन पहिल्या कसोटीत खेळला तरी बॉलिंग करणार नसल्याचं स्पष्ट झालंय. तसेच ग्रीन पहिल्या सामन्यात खेळणार की नाही, हे स्पष्टपणे सांगता येणार नाही, असं कॅप्टन कमिन्सने स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

कमिन्स काय म्हणाला?

“मला माहितीय की ग्रीन पहिल्या टेस्टमध्ये बॉलिंग करणार नाही. मात्र तो पूर्णपणे फीट आहे की नाही हे पुढील आठवड्यातच स्पष्ट होईल. त्यामुळे पुढील आठवडा हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. मला आशा आहे की तो पूर्णपणे सावरला असेल”, असं फॉक्स स्पोर्ट्सने कमिन्सने दिलेल्या माहितीनुसार सांगितलंय.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिली कसोटी, 9-13 फेब्रुवारी, नागपूर

दुसरी कसोटी, 17-21 फेब्रुवारी, नवी दिल्ली

तिसरी कसोटी, 1-5 मार्च, धर्मशाळा

चौथी कसोटी, 9-13 मार्च, अहमदाबाद

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वॉर्नर, एश्टोन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, पीटर हॅंडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.

Non Stop LIVE Update
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.