IND vs AUS | बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटरची अचानक एन्ट्री

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. मालिकेतील पहिला सामना हा 9 फेब्रुवारीपासून नागपुरातील व्हीसीए स्टेडियमवर पार पडणार आहे.

IND vs AUS | बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटरची अचानक एन्ट्री
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 8:38 PM

मुंबई : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी आणि त्यानंतर एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्याची सुरुवात टेस्ट सीरिजने होणार आहे. एकूण 4 सामन्यांची ही कसोटी मालिका असणार आहे. मालिकेतील पहिल्या सामन्याला हा 9 फेब्रुवारीला नागपुरात सुरुवात होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप अंतिम सामन्याच्या दृष्टीने टीम इंडियासाठी ही महत्त्वाची मालिका आहे. त्यानुसार टीम इंडियाने कंबर कसली आहे. तर ऑस्ट्रेलियाही सज्ज आहे.

या घडामोडींदरम्यान बॉर्डर गावसकर ट्रॉफीत टीम इंडियाच्या स्टार खेळाडूची एन्ट्री झाली आहे. टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर आणि बॅटर दिनेश कार्तिकची एन्ट्री झालीय. दिनेशने स्वत: याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.

हे सुद्धा वाचा

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेत दिनेश कार्तिकची एन्ट्री झालीय. मात्र कार्तिकची खेळाडू म्हणून नाही, तर समालोचक म्हणून एन्ट्री झाली आहे.

दिनेशने या ट्विटमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी पदार्पणाच्या आठवणींना उजाळा दिला. कार्तिकने 2004 मध्ये मुंबईत ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट डेब्यू केलं होतं. तर 2018 मध्ये इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्सवर अखेरचा कसोटी सामना खेळला होता.

ट्विटमध्ये काय म्हटलंय?

“ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी पदार्पण भारतात केलं होतं. पुन्हा एकदा असंच व्हायला जातंय. #Excited #INDvsAUS”, असं ट्विट कार्तिकने केलंय. कार्तिकची बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत कॉमेंट्री करण्याची पहिलीच वेळ ठरणार आहे.

दिनेश कार्तिक याचं ट्विट

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिली कसोटी, 9-13 फेब्रुवारी, नागपूर

दुसरी कसोटी, 17-21 फेब्रुवारी, नवी दिल्ली

तिसरी कसोटी, 1-5 मार्च, धर्मशाळा

चौथी कसोटी, 9-13 मार्च, अहमदाबाद

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वॉर्नर, एश्टोन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, पीटर हॅंडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.