टीम इंडियासाठी वाईट बातमी, स्टार बॉलर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरिजमधूनही ‘आऊट’

संजय पाटील, Tv9 मराठी

Updated on: Jan 25, 2023 | 8:19 PM

टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध 9 फेब्रुवारीपासून 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेआधी टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे.

टीम इंडियासाठी वाईट बातमी, स्टार बॉलर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरिजमधूनही 'आऊट'

मुंबई : टीम इंडियाचा स्टार बॉलर ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराह याच्याबाबत अनेक माहिती समोर येत आहे. कॅप्टन रोहित शर्मा याने बुमराह ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या 2 सामन्याआधी फिट होईल, अशी आशा व्यक्त केली होती. मात्र आता बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने महत्त्वाची माहिती दिली आहे. ही माहिती भारतीय चाहत्यांची आणि टीम मॅनेजमेंटची चिंता वाढवणारी आहे.

बुमराह टीम इंडियातून गेले अनेक महिने दुखापतीमुळे बाहेर आहे. बुमराहला दुखापतीमुळे श्रीलंका विरुद्धच्या वनडे सीरिजमधून बाहेर व्हाव लागलं होतं. तसेच न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे आणि टी 20 सीरिजमध्ये निवड करण्यात आली नाही.

आता टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 सीरिजनंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी आणि वनडे सीरिज खेळणार आहे. या कसोटी मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. त्यातही बुमराहचा समावेश नाही. त्यात आता बीसीसीआय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीमुळे टीम इंडियाच्या चाहत्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.

बीसीसीआय अधिकारी काय म्हणाले?

इनसाईड स्पोर्ट्सने बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानेन दिलेल्या माहितीनुसार, “बुमराह ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरिजमध्ये 100 टक्के कामगिरी करेल, याची शक्यता फार कमी आहे. ही निश्चित आहे की आपण कोणतीही सीरिज खेळोत. पण बुमराहला फीट होण्यासाठी आणखी वेळ लागेल. पाठीची दुखापत ठीक होण्यासाठी वेळ लागतो. ही एक मोठी प्रक्रिया आहे”, असं बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला.

“बुमराह सध्या सेलेक्शनसाठी उपलब्ध नाहीये. बुमराहला कमबॅकसाठी किती वेळ लागेल, हे ही नक्की नाही. यात किमान 1 महिना किंवा त्यापेक्षा अधिक वेळ लागू शकतो”, असंही त्या अधिकाऱ्याने नमूद केलं.

बुमराह ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या शेवटच्या 2 कसोटी सामन्यांआधी फीट होईल, असा विश्वास टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने व्यक्त केला होता. न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला. यानंतर रोहित बोलत होता. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह गेल्या सप्टेंबर महिन्यापासून क्रिकेटपासून दूर आहे.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिली कसोटी, 9-13 फेब्रुवारी, नागपूर

दुसरी कसोटी, 17-21 फेब्रुवारी, नवी दिल्ली

तिसरी कसोटी, 1-5 मार्च, धर्मशाळा

चौथी कसोटी, 9-13 मार्च, अहमदाबाद

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया

हे सुद्धा वाचा

रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI