IND vs AUS | टीम इंडियातील खेळाडूच्या भावाने अंडर 19 वर्ल्ड कप फायनल सामन्यात घेतला कडक कॅच, पाहा व्हिडीओ

Musheer khan : अंडर 19 वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामधील फायनल सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. या सामन्यात एका खेळाडूने दमदार कॅच घेतला.

IND vs AUS | टीम इंडियातील खेळाडूच्या भावाने अंडर 19 वर्ल्ड कप फायनल सामन्यात घेतला कडक कॅच, पाहा व्हिडीओ
Musheer khan Catch under 19 world cup
| Updated on: Feb 11, 2024 | 8:59 PM

मुंबई : अंडर19 वर्ल्ड कपची फायनल टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू आहे. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्याकडे अवघ्या क्रिकेट जगताचं लक्ष लागलं आहे. टीम इंडियाच्या टीममधील खेळाडू सर्फराज खान याचा लहान भाऊ मुशीर खान याने शानदार कॅच घेतला.  मुशीर खान याने घेतलेला कॅच पाहून क्रिकेट चाहते त्याचं कौतुक करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:-

 

सामन्याच्या 40 व्या ओव्हरमझध्ये मुशीर खान हा ओव्हर टाकत होता. ओव्हरमधील पाचव्या बॉलवर राफ मॅकमिलन याला दोन धावांवर माघारी पाठवलं. राफ मॅकमिलन चेंडू प्लेड केला वेगाने जात होता तेव्हा मुशीर खान याने चपळाई दाखवत एक कमाल कॅच घेतला. या कॅचनंतर ऑस्ट्रेलियाचा खेळाडूही अवाक झाला होता.

मुशीर खान हा टीम इंडियामधील सर्फराज खान याचा लहान भाई आहे. मुशीर खाने याने वयाच्या आठव्या वर्षी टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि सिक्सर किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या युवराज सिंह याला आऊट केलं होतं.

ऑस्ट्रेलिया अंडर 19 प्लेईंग ईलेव्हन | ह्यू वेबगेन (कॅप्टन), हॅरी डिक्सन, सॅम कोन्स्टास, हरजस सिंग, रायन हिक्स (विकेटकीपर), ऑलिव्हर पीक, राफ मॅकमिलन, चार्ली अँडरसन, टॉम स्ट्रेकर, महली बियर्डमन आणि कॅलम विडलर

टीम इंडिया अंडर 19 प्लेईंग इलेव्हन | उदय सहारन (कर्णधार), आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी आणि सौम्य पांडे.