AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG | टीम इंडिया पुन्हा त्या खेळाडूवर ‘मेहरबान’, वर्षेभरात एकही फिफ्टी न करणाऱ्या खेळाडूचा ‘गॉडफादर’ कोण?

IND vs ENG 3rd Test : टीम इंडिया आणि इंग्लंडमधील कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणी बीसीसीआयकडून करण्यात आली आहे. या संघामध्ये एक असा खेळाडू ज्याला खराब प्रदर्शनानंतरही स्थान मिळालं आहे. कोण आहे हा खेळाडू जाणून घ्या.

IND vs  ENG | टीम इंडिया पुन्हा त्या खेळाडूवर 'मेहरबान', वर्षेभरात एकही फिफ्टी न करणाऱ्या खेळाडूचा 'गॉडफादर' कोण?
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Feb 11, 2024 | 5:34 PM
Share

मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या उर्वरित कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने संघाची घोषणा केली आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडिया आणि इंग्लंड यांनी जिंकलेत. आता मालिका 1-1 ने बरोबरीत असून येत्या 15 फेब्रुवारीला तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात होणार आहे. आता उर्वरित तीन सामन्यांसाठी जाहीर झालेल्या संघामध्ये परत एकदा फ्लॉप ठरलेल्या खेळाडूला संधी देण्यात आली आहे. नेमका कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.

कोण आहे तो खेळाडू?

टीम इंडियामध्ये हा खेळाडू गेल्या एक वर्षभरापासून खेळत आहे. या खेळाडूने आता सुरु असलेल्या इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेमध्येही खास कामगिरी करता आली नाही. २०२३ साली डेब्यू केलेल्या या खेळाडूने सात कसोटी सामन्यांमध्ये 12 डावांमध्ये अवघ्या 221 धावा केल्या आहेत. यामधील 44 या खेळाडूचा सर्वाधिक स्कोर आहे. हे आकडे वाईट असले तरीपण त्याला संघात कोणाच्या वशिल्यावर तर नाही ना स्थान मिळत आहे? असा सवाल क्रिकेट चाहत्यांनी केली आहे.

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळतं की नाही? कारण के. एल. राहुल संघात आल्यावर त्याला बाहेर ठेवलं जावू शकतं. याचा संघाला असा फायदा होईल की फक्त कीपिंगसाठी भरत याला संधी देण्यापेक्षा राहुल हा कीपिंगसह बॅटींग करेल. त्यामुळे आणखी एका खेळाडूला गरजेनुसार खेळवता येईल. के एस भरत याला ऋष पंत याच्या जागी संधी मिळाली होती. पंत याचा अपघात झाला त्यानंतर राहुलची दुखापत यामुळे त्याला संघात जागा मिळाली होती.

टीम इंडियाचा तीन सामन्यांसाठी संघ

रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल (फिटनेस), रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरैल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा (फिटनेस), अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार और आकाश दीप.

Follow Us
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...