
वूमन्स टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. टीम इंडिया या दौऱ्यात सध्या टी 20i मालिका खेळत आहे. उभयसंघात टी 20i मालिकेनंतर वनडे सीरिज खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर एकमेव कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे. सध्या टीम इंडिया या 3 सामन्यांच्या टी 20i मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारताला सलग दुसरा सामना जिंकून मालिकेवर नाव कोरण्याची संधी आहे. यजमान संघाची सुरुवात पराभवाने झाली. त्यामुळे आता मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या सामन्यात कोणत्याही स्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे दुसर्या सामन्यात कांगारुंचा चांगलाच कस लागणार आहे. त्यामुळे या सामन्यात यजमान पाहुण्या संघासमोर कशी कामगिरी करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात रविवारी 15 फेब्रुवारीला ऑस्ट्रेलियावर डीएलएसनुसार 21 धावांनी विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियाने सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये 18 ओव्हरमध्ये ऑलआऊट 133 धावा केल्या होत्या. त्यानंतर टीम इंडियाच्या बॅटिंगदरम्यान पावसाने खोडा घातला. भरताने तोवर 5.1 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 50 धावा केल्या. त्यानंतर पावसामुळे सामन्याचा निकाल डीएलएसनुसार लावण्यात आला. भारताने हा सामना 21 धावांनी जिंकला. भारताने अशाप्रकारे 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
आता टीम इंडियाला सलग दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलिया मालिका वाचवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर दुसऱ्या बाजूला मालिका गमवायची नसेल तर ऑस्ट्रेलियाला कोणत्याही स्थितीत दुसरा सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्याच्या निकालाकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
उभयसंघातील दुसरा सामना हा कॅनबेरातील मानुका ओव्हलमध्ये होणार आहे. सोफी मोलिनेक्स ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. सामन्याला दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
दरम्यान भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात टी 20i मालिकेनंतर वनडे सीरिजचा थरार रंगणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात सलामीवीर प्रतिका रावल हीचा समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. उभयसंघात 24 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान ही मालिका होणार आहे.