AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Aus WTC Final 2023 : 4 वर्षानंतर अनुष्का शर्मा आणि रितिका सजदेह यांच्यातील भांडण मिटलं का?

Ind vs Aus WTC Final 2023 : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे ही चर्चा सुरु झाली आहे. भांडण कशावरुन झालं होतं? त्यावेळी काय घडलेलं?

Ind vs Aus WTC Final 2023 : 4 वर्षानंतर अनुष्का शर्मा आणि रितिका सजदेह यांच्यातील भांडण मिटलं का?
Anushka sharma-Ritika sajdehImage Credit source: instagram
| Updated on: Jun 08, 2023 | 7:41 AM
Share

लंडन : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये आमने-सामने आहे. WTC Final 2023 चा किताब जिंकण्यासाठी दोन्ही टीम्समध्ये सामना सुरु आहे. काल कसोटीचा पहिला दिवस होता. फायनलच्या पहिल्या दिवशी प्रेक्षक स्टँडमधला एक फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आणि कॅप्टन रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह यांच्यातील भांडण मिटल्याची चर्चा रंगली आहे.

अनुष्का आणि रितिकामध्ये सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चा होती. 2019 मध्ये रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना अनफॉलो केलं. त्यानंतर विराट आणि अनुष्काने उपरोधिक मेसेज पोस्ट केला होता. त्यामुळे विविध अफवा पसरल्या होत्या.

दोघींबद्दल रवी शास्त्री यांनी उत्तर देणं टाळलं

4 वर्षापूर्वी एका पत्रकार परिषदेत रितिका आणि अनुष्काबद्दल प्रश्न सुद्धा विचारण्यात आले होते. त्याची उत्तर देणं रवी शास्त्री यांनी टाळलं होतं. त्यानंतर रितिका आणि अनुष्का फार कमीवेळा सोबत दिसल्या. दोघी स्टेडियममध्ये उपस्थित रहायच्या. पण वेगवेगळ्या बसत होत्या.

रितिका अनेकदा आपल्या गर्ल्स गँगसोबतचे मॅचचे फोटो शेयर करायची. त्या फोटोंमध्ये अनुष्का कधी दिसली नाही.

आगीसारखा व्हायरल झाला फोटो

आता बऱ्याच काळानंतर लंडनमध्ये दोघी एकाच फ्रेममध्ये दिसल्या आहेत. हा फोटो पाहिल्यानंतर दोघींमधील भांडण मिटल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. सोशल मीडियावर दोघींचा एकाच स्टँडमधील फोटो आगीसारखा व्हायरल झालाय. रोहितने कालच्या सामन्यात टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली. पहिल्या दिवसाच्या खेळात टीम इंडिया बॅकफूटवर आहे. पहिल्या दिवसाच्या खेळात काय स्थिती?

ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाच्या खेळात 85 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 327 धावा केल्या आहेत. ट्रेव्हिसने 156 बॉलमध्ये 22 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने नाबाद 146 धावा केल्या, तर स्टीव्हन स्मिथ शतकाच्या उंबरठ्यावर आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.