
टीम इंडिया आणि बांगलादेशविरूद्धचा पहिला कसोटी सामना सुरू आहे. पहिल्याच दिवशी टीम इंडियाने 339-6 धावा केल्या होत्या. यामध्ये आर. अश्विन आणि रविंद्र जडेजा यांची 197 धावांची भागीदारी महत्त्वाची ठरली. कारण टीम इंडिया संकटात सापडली असताना अश्विन आणि जडेजाने मैदानावर तळ ठोकला.

टीम इंंडियाची पहिल्या डावातील सुरूवाता एकदम खराब झाली. बांगलादेशच्या युवा 24 वर्षीय गोलंदाजाने टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरला खिंडार पाडलं होतं.

रोहित शर्मा 6 धावा, शुबमन गिल 0 धावा आणि विराट कोहली 6 धावा या तिघांनाही बांगलादेशच्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने माघारी पाठवलं होता. एकवेळ टीम इंडियाची अवस्था 34-3 अशी झाली होती. त्यानंतर रिषभ पंत आणि यशस्वी जयस्वाल यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता.

यशस्वी आणि पंतची भागीदारी चांगली झाली होती. पण एकदा 39 धावांवर खेळत असणाऱ्या पंतला याच गोलंदाजाने माघारी धाडलं. टीम इंडिया घरच्या मैदानावर पिछाडीवर पडली होता. 24 वर्षाच्या युवा गोलंदाजाचं नाव हसन महमुद आहे.

हसन महमुद हा करियरमधील चौथा कसोटी सामना खेळत आहे. पाकिस्तानविरूद्धच्या दोन कसोटी सामन्यातही त्याने आठ विकेट घेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र इतर गोलंदाजांकडून त्याला योग्य साथ मिळाली नाही.