AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN : बांगलादेशला हैदराबादमध्ये क्लीन स्वीप फिक्स! आकडेच सांगतात सत्य

India vs Bangladesh 3rd T20i: टीम इंडियाची आतापर्यंत हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यातही बांगलादेशचा पराभव निश्चित असल्याचं म्हटलं जात आहे.

IND vs BAN : बांगलादेशला हैदराबादमध्ये क्लीन स्वीप फिक्स! आकडेच सांगतात सत्य
bangldesh national anthem Image Credit source: bcci
| Updated on: Oct 11, 2024 | 9:38 PM
Share

टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात 3 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडिया सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वातमध्ये या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. आता टीम इंडियाचं लक्ष हे बांगलादेशला क्लीन स्वीप करण्याकडे आहे. बांगलादेशवर सलग दुसऱ्या मालिकेत क्लीन स्वीपची टांगती तलवार आहे. टीम इंडियाने याआधी रोहित शर्माच्या नेतृत्वात बांगलादेशला कसोटी मालिकेत 2-0 ने पराभूत केलं होतं. आता या टी 20I मालिकेतील तिसरा सामना अशा ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे जिथे टीम इंडियाची शानदार कामगिरी राहिली आहे.

उभयसंघातील तिसरा आणि अंतिम सामना हा हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये होणार आहे. टीम इंडियाने या मैदानात आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भारताने या मैदानात आतापर्यंत एकही टी20I सामना गमावलेला नाही. अशात युवा ब्रिगेडचा हा विक्रम कायम ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे. टीम इंडियाने या मैदानात आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही टी20I सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच भारतीय संघाने या मैदानात एकूण 15 सामने खेळले आहेत त्यापैकी 10 वेळा विजय मिळवला आहे. तर 4 वेळा पराभूत व्हावं लागलं आहे.

टीम इंडियाची आकडेवारी

भारतीय संघाने या मैदनात 2019 साली विंडिज विरुद्ध पहिला टी 20I सामना खेळला होता. तेव्हा टीम इंडियाने 208 धावांचं आव्हान 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण करत विजय मिळवला होता. तर बैदराबादमधील दुसऱ्या सामन्यातही 6 विकेट्सने विजय मिळवलेला. तेव्हा टीम इंडियाने कांगारुंचा पराभव केला होता. त्यामुळे आता टीम इंडिया या मैदानात आणि मालिकेत विजयी हॅटट्रिक पूर्ण करणार का? याकडे लक्ष असणार आहे.

टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हार्दिक पंड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मयंक यादव, जितेश शर्मा, तिलक वर्मा, रवी बिश्नोई आणि हर्षित राणा.

बांगलादेश क्रिकेट टीम : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), परवेझ हुसेन इमॉन, लिटन दास (विकेटकीपर), तॉहीद हृदोय, महमुदुल्ला, जाकेर अली, मेहिदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, शॉरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान, महेदी हसन, तनजीद हसन, रकीबुल हसन आणि तंजीम हसन साकिब.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच