
टीम इंडियाने अफगाणिस्तानवर सुपर 8 मध्ये मात करत टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. टीम इंडिया आता सुपर 8 मधील दुसरा सामना हा 22 जून रोजी बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून सेमी फायनलमध्ये पोहचण्याची संधी आहे. कॅप्टन रोहित शर्मा याने अफगाणिस्तान विरुद्ध पहिल्यांदाच या स्पर्धेत टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला. त्यानंतर आता रोहित बांगलादेश विरुद्ध पुन्हा प्लेइंग ईलेव्हनमध्ये करण्याची शक्यता आहे.
रोहित शर्मा मुंबईकर ऑलराउंडर शिवम दुबे याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. शिवमला साखळी फेरीतील 3 आणि अफगाणिस्तान विरुद्ध सुपर 8 मधील सामन्यात संधी मिळाली. मात्र शिवमला यूएसए विरूद्धच्या खेळीचा अपवाद वगळता त्याला काही खास करता आलेलं नाही. शिवमने यूएसए विरुद्ध 31 धावांची खेळी केली होती. शिवमने 4 सामन्यांमध्ये अनुक्रमे 0, 3, 31 आणि 10 अशा एकूण 44 धावा केल्या.
शिवमच्या जागी प्लेइंग ईलेव्हनमध्ये विकेटीकपर बॅट्समन संजू सॅमसन याचा समावेश केला जाऊ शकतो. संजूला या स्पर्धेत अद्याप संधी मिळाली नाही. त्यामुळे आता कॅप्टन रोहित शिवमच्या जागी संजूलाच संधी देणार की नाही? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडिया संभावित प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, संजू सॅमसन, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंह.
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
बांग्लादेश क्रिकेट टीम: नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तांझिद हसन, लिटॉन दास (विकेटकीपर), शकिब अल हसन, तॉहीद ह्रदोय, महमुदुल्ला, महेदी हसन, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तन्झिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान, जाकेर अली, तन्वीर इस्लाम, शरीफुल इस्लाम आणि सौम्या सरकार.