IND vs BAN Toss : शेवटच्या सामन्यात तिघींना विश्रांती, उमा चेत्रीचं पदार्पण, हरमनप्रीतचा बांगलादेश विरुद्ध फिल्डिंगचा निर्णय

India Women vs Bangladesh Women Toss And Playing 11 : नवी मुंबईतील भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सामन्यात पावसाने खोडा घातल्याने विलंबाने टॉस झाला. पाहा दोन्ही संघांची प्लेइंग ईलेव्हन.

IND vs BAN Toss : शेवटच्या सामन्यात तिघींना विश्रांती, उमा चेत्रीचं पदार्पण, हरमनप्रीतचा बांगलादेश विरुद्ध फिल्डिंगचा निर्णय
INDW vs BANW Odi Womens World Cup 2025
Image Credit source: bcci women X Account
| Updated on: Oct 27, 2025 | 12:43 AM

आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत आज रविवारी 26 ऑक्टोबर रोजी डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं आहे. दिवसातील पहिल्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड आमनेसामने आहेत. तर स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात यजमान टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश आमनेसामने आहेत. हा सामना नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. सामन्याला नियोजित वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणं अपेक्षित होतं. मात्र पावसामुळे टॉस आणि सामन्याला सुरुवात होण्यास विलंब झालं आहे.

पावसाने काही मिनिटं विश्रांती घेतल्यानंतर तब्बल 35 मिनिटांच्या विलंबाने अर्थात 3 वाजून 5 मिनिटांनी नाणेफेक करण्यात आली. भारताच्या बाजूने कौल लागला. कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने फिल्डिंगचा निर्णय घेत बांगलादेशला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. सामन्याला दुपारी 3 वाजून 25 मिनिटांनी सुरुवात होणं अपेक्षित होतं. मात्र पावसामुळे पुन्हा विलंब झाला आहे. त्यामुळे आता चाहत्यांना सामन्याची सुरुवात केव्हा होते? याची प्रतिक्षा आहे.

तिघींनी विश्रांती, एकीचं पदार्पण

टीम इंडियाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा सामना फक्त औपचारिकताच आहे. त्यामुळे या सामन्यात टीम इंडियाने तिघींनी विश्रांती दिली आहे. तर एकीला पदार्पणाची संधी दिली आहे. रिचा घौष, क्रांती गौड आणि स्नेह राणा या तिघींना विश्रांती दिली आहे.

उमा चेत्रीचं एकदिवसीय पदार्पण

तसंच उमा चेत्री हीला एकदिवसीय पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. उमाला टॉस आधी उपकर्णधार स्मृती मंधाना हीने वनडे कॅप दिली आणि एकदिवसीय संघात स्वागत करत शुभेच्छा दिल्या.

दरम्यान बांगलादेश पॉइंट्स टेबलमध्ये 2 गुणांसह सर्वात शेवटी अर्थात आठव्या स्थानी आहे. त्यामुळे बांगलादेशचा हा सामना जिंकून मोहिमेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र बांगलादेशसाठी ते वाटतं तितकं सोपं नाही.

बांगलादेश महिला प्लेइंग ईलेव्हन: सुमैया अक्टर, रुबिया हैदर झलिक, शर्मीन अख्तर, शोभना मोस्तरी, निगार सुलताना (कॅप्टन आणि विकेटकीपर), शोर्ना अक्टर, रितू मोनी, राबेया खान, नाहिदा अक्टर, निशिता अक्टर निशी आणि मारुफा अक्टर.

वूमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), प्रतिका रावल, स्मृती मानधना, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, उमा चेत्री (विकेटकीपर), अमनजोत कौर, राधा यादव, श्री चरणी आणि रेणुका सिंग ठाकूर.