AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG 2nd Test | दुसरा दिवस टीम इंडियाच्या नावावर, इंग्लंड विरुद्ध 171 धावांची आघाडी

India vs England 2nd Test Day 2 Highlights In Marathi | टीम इंडियाच्या नाववर दुसरा दिवस राहिला आहे. टीम इंडियाने दुसऱ्याच दिवशी सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे.

IND vs ENG 2nd Test | दुसरा दिवस टीम इंडियाच्या नावावर, इंग्लंड विरुद्ध 171 धावांची आघाडी
| Updated on: Feb 03, 2024 | 5:29 PM
Share

विशाखापट्टणम | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाच्या नावावर दुसरा दिवस राहिला आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 396 धावा केल्यानंतर इंग्लंडला 253 धावांवर गुंडाळलं. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या डावात 143 धावांची आघाडी मिळाली. या आघाडीसह टीम इंडियाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 5 ओव्हरमध्ये बिनबाद 28 धावा केल्या. यासह टीम इंडियाकडे 171 धावांची आघाडी झाली आहे. कॅप्टन रोहित शर्मा 13 आणि पहिल्या डावात द्विशतक करणारा यशस्वी जयस्वाल 15 धावांवर नााबाद परतला आहे.

इंग्लंडची बॅटिंग

टीम इंडियाने त्याआधी इंग्लंडला पहिल्या डावात 256 धावांवर ऑलआऊट केलं. इंग्लंडने 396 धावांच्या प्रत्युत्तरात चांगली सुरुवात केली. पहिल्या 2 विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र त्यानंतर टीम इंडियाचे गोलंदाज इंग्लंडवर वरचढ ठरले. एक एक करत इंग्लंडला ऑलआऊट केलं. इंग्लंडकडून झॅक क्रॉली याने 74 तर बेन स्टोक्स याने 47 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह याने 6 विकेट्स घेत इंग्लंडची कंबर तोडली. तर कुलदीप यादव याने 3 तर अक्षर पटेल याने 1 विकेट घेतली.

टीम इंडियाने पहिल्या दिवसअखेर 6 विकेट्स गमावून 336 धावा केल्या होत्या. टीम इंडियाने दुसऱ्या दिवशी फक्त 60 धावा जोडल्या. अशाप्रकारे टीम इंडियाने दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात ऑलआऊट 396 धावा केल्या. यशस्वी जयस्वाल याने 209 धावांची खेळी केली. यशस्वी एकटाच लढला. मात्र इतर अपयशी ठरले. पण यशस्वीच्या द्विशतकामुळे इतरांच अपयश झाकलं गेलं. यशस्वीचं कसोटीतील पहिलंवहिलं द्विशतक ठरलं. तर इंग्लंडकडून जेम्स एंडरसन, शोएब बशीर आणि रेहान अहमद या तिघांनी 3-3 विकेट्स घेतल्या. तर टॉम हार्टली याच्या खात्यात 1 विकेट गेली.

टीम इंडियाची दुसऱ्या सामन्यात मजबूत स्थितीत

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भारत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार.

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.