Video : ब्रूक-स्मिथची जोडी आकाश दीपने अशी फोडली, नवा चेंडू मिळताच केली कमाल

भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु असून पहिल्या डावाचा खेळ संपला आहे. पहिल्या डावात भारताने 180 धावांची आघाडी घेतली. पण ब्रूक-स्मिथ जोडी फोडली नसती तर ही आघाडी पण मिळाली नसती. आकाश दीपने अशी काढली विकेट...

Video : ब्रूक-स्मिथची जोडी आकाश दीपने अशी फोडली, नवा चेंडू मिळताच केली कमाल
Video : ब्रूक-स्मिथची जोडी आकाश दीपने अशी फोडली, नवा चेंडू मिळताच केली कमाल
Image Credit source: BCCI
| Updated on: Jul 04, 2025 | 10:50 PM

भारत इंग्लंड दुसरा कसोटी सामना आता उत्कंठा वाढवणाऱ्या वळणार येऊन ठेपला आहे. तिसऱ्या दिवशी पहिल्या डावाचा खेळ संपला. भारताने पहिल्या डावात 587 धावा केल्याने गोलंदाजांची बाजू भक्कम होती. पण इतक्या दडपणातही भारतीय गोलंदाजांना त्यांना कमी धावांवर रोखणं काही जमलं नाही. इंग्लंडने सर्व गडी गमवून 407 धावा केल्या. पहिल्या डावात भारताकडे 180 धावांची आघाडी आहे. खरं पहिला कसोटी सामना आणि पहिल्या डावातील इंग्लंडची खेळी पाहता भारताला दुसऱ्या डावात 400 पार धावा दिल्या तरच विजय शक्य होईल असं दिसत आहे. अन्यथा दुसरा कसोटी सामनाही भारताच्या हातून जाईल. कारण भारताच्या गोलंदाजीत हवा तसा दम दिसत नाही. दरम्यान, इंग्लंडने पहिल्या डावात 84 धावांवर 5 गडी गमवले होते. पण त्यानंतर सहाव्या विकेटसाठी हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ यांनी 300हून अधिक धावांची भागीदारी केली. पण ही भागीदारी मोडली नसती तर भारताची आघाडी फार काही नसती हे देखील तितकंच खरं आहे.

हॅरी ब्रूकच्या आक्रमक खेळीचा शेवट आकाशदीपने केला. खरं तर त्याने टाकलेला चेंडू हॅरी ब्रूकला कळलाच नाही. कारण हा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर पडला होता. हा चेंडू पडताच वेगाने आत घुसला. ब्रूकला काही कळायच्या आत स्टंप घेऊन गेला. हा चेंडू पाहून ब्रूक देखील आश्चर्यचकीत झाला. ब्रूकने पहिल्या डावात जेमी स्मिथसोबत सहाव्या विकेटसाठी 368 चेंडूंचा सामना करत 303 धावांची भागीदारी केली.

हॅरी ब्रूकने या सामन्यात आक्रमक खेळी केली. त्याने पहिलं अर्धशतक 72 चेंडूत पूर्ण केलं. त्यानंतर 137 चेंडूत शतक ठोकलं.तर एक षटकार आणि 17 चौकारासह ब्रूकने 234 चेंडूत 158 धावा केल्या. ब्रूकने कसोटी क्रिकेटमधील 9वं शतक ठोकलं. भारताविरुद्ध त्याचं पहिलं कसोटी शतक होत.