IND vs ENG, 3rd T20 Match: प्लेइंग 11 मध्ये पुन्हा एकदा बदल, नाणेफेकीनंतर कर्णधार श्रेयस म्हणाला…
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना होत आहे. या सामन्यात प्लेइंग 11 कशी असेल याबाबत चर्चा रंगली होती. अखेर यावर पडदा पडला आहे. कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेकीनंतर स्पष्ट काय ते सांगितलं.

इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील दोन सामन्यानंतर टीम इंडिया 0-1 ने पिछाडीवर आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. ही मालिका जिंकायची असल्यास भारताला काहीही करून सलग तीन सामने जिंकणं भाग आहे. त्यामुळे या सामन्यात कोणत्या प्लेइंग 11 सह उतरणार याची चर्चा रंगली होती. दुसऱ्या टी20 सामन्यात प्लेइंग 11 मध्ये बदल करण्यात आला होता. संजू सॅमसनला बसवून वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी दिली होती. आता मालिकेसाठी करो या मरोची स्थिती असताना पुन्हा एकदा प्लेइंग 11 मध्ये बदल करण्यात आला आहे. पण संजू सॅमसनला पुन्हा एकदा तिसऱ्या टी20 सामन्यातून वगळण्यात आलं आहे. फक्त संघात एकच बदल केला गेला आहे. रवि बिष्णोईला बसवून प्रिन्स यादवला संधी दिली गेली आहे.
नाणेफेकीचा कौल टिम इंडियाच्या बाजूने लागला आणि कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. ती एक छोटीशी अडचण होती, जी आपल्या नियंत्रणात नसते, पण मुलांचा उत्साह दांडगा आहे. प्रत्येक खेळाडू आयुष्यात अशा टप्प्यातून जातो. त्याच्यासाठी आणि संघासाठीही हा एक मोठा धडा आहे. खेळपट्टी पाहता मला वाटते की ती खूप सुंदर आहे. रवी बिश्नोईच्या जागी प्रिन्स यादव फलंदाजीला आला आहे.’
हॅरी ब्रुक म्हणाला की, ‘आम्ही द्विधा मनस्थितीत होतो, पण आम्ही प्रथम फलंदाजी केली असती. या संघासोबत खेळताना आपण सामन्यातून बाहेर पडलो आहोत, असे आम्हाला कधीच वाटत नाही. भारत आणि इतर कोणत्याही देशाविरुद्धचा प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो. आम्हाला 2-0 अशी आघाडी घ्यायची आहे.’
दोन्ही संघांची प्लेइंग 11
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, जोस बटलर (यष्टीरक्षक), हॅरी ब्रुक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, जोश टंग.
भारत (प्लेइंग इलेव्हन) : अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), शिवम दुबे, तिलक वर्मा, अक्षर पटेल, हर्षित राणा, प्रिन्स यादव, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती