
टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेत आता चुरस निर्माण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. टीम इंडियाने पहिल्यांदा बॅटींग करताना 445 धावांचा डोंगर उभारला आहे.

टीम इंडियाच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. कसोटी सुरू असताना एका स्टार खेळाडूच्या पत्नीची चर्चा होताना दिसत आहे. कारण ती स्वत: ला विधवा म्हणून घेत आहे.

क्रिकेट चाहत्यांना प्रश्न पडला की स्टार खेळाडूची पत्नी स्वत:ला विधवा का बोलत आहे. याचं कारण नेमकं असं काय आहे याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

हा स्टार खेळाडू जेम्स अँडरसन असून त्याची पत्नी डॅनियलने आपल्या इन्स्टाच्या बायोमध्ये तसं म्हटलं आहे. डॅनियलने गोल्फ विधवा असं मजेशीर कॅप्शन आपल्या बायोमध्ये लिहिलं आहे.

डॅनियल आणि अँडरसन यांनी 2006 मध्ये विवाह केला होता. पेक्षा सात वर्षांनी मोठी आहे. दोघांना दोन मुली असून त्यातील एक 14 तर एक 15 वर्षांची आहे.