
मोहम्मद सिराज याचा सामन्यातील कामगिरीपेक्षा उत्साह दाखण्याचा मोह असतो. आतापर्यंत त्याने मैदानात अनेकदा आक्रमकता दाखवली आहे. असंच काहीसं त्याने लॉर्ड्स कसोटी सामन्यात केलं. पण यावेळी त्याने सर्व मार्यादा ओलांडल्या. दुसऱ्या डावात बेन डकेटला बाद केल्यानंतर मोहम्मद सिराज जास्तच आक्रमक झाला. इतक्यावरच थांबला नाही तर त्याच्या जवळ जाऊन तोंडावर ओरडू लागला. तसेच खांदाही मारला. त्यानंतर सामनाधिकाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई केली आहे. त्याला आयसीसी आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. यासाठी त्याच्या सामना फीमधून 15 टक्के रक्कम कापली आहे. इतकंच नाही तर एक डिमेरीट पॉइंटही दिला आहे. त्यामुळे त्याचे दोन डिमेरीट पॉइंट झाले आहेत. त्यामुळे त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली जाऊ शकते. काय आहे आयसीसी डिमेरिट पॉइंट नियम…
मोहम्मद सिराजवर बंदीची टांगती तलवार आहे. आयसीसीच्या डिमेरिट पॉइंट सिस्टममुळे त्याच्यावर बंदी घातली जाऊ शकते. मोहम्मद सिराजचे दोन डिमेरिट पॉइंट झाले आहेत आणि दोन डिमेरिट पॉइंट असतील तर 24 महिन्यांसाठी त्याच्यावर बंदी घातली जाऊ शकते. कोणताही खेळाडू लेव्हल 1 मध्ये दोषी आढळला तर क-2 डिमेरिट पॉइंट्स मिळतात. जर हे डिमेरिट पॉइंट्स 3-4 झाले तर त्या खेळाडूवर एक कसोटी सामन्यासाठी किंवा दोन एकदिवसी-टी20 सामन्यासाठी बंदी घातली जाऊ शकते. म्हणजेच सिराजने पुन्हा लॉर्ड्ससारखी चूक केली तर त्याला शिक्षा भोगावी लागेल. तसेच त्याची मॅच फी देखील कापली जाईल.
India’s Mohammed Siraj has been fined 15% of his match fee and given one demerit point for his celebration of Ben Duckett’s wicket. ❌
Two demerit points in a 24-month period triggers a ban.#ENGvIND #BBCCricket pic.twitter.com/NWz7fH8cOp
— Test Match Special (@bbctms) July 14, 2025
मोहम्मद सिराज पहिल्या कसोटी सामन्यात महागडा ठरला होता. त्याच्या पदरात फक्त दोन विकेट पडल्या होत्या. मात्र उर्वरित दोन कसोटी सामन्यात त्याने चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने 7 विकेट घेतल्या. त्यामुळे टीम इंडियाचा विजय सोपा झाला होता. तर लॉर्ड्स कसोटीतही त्याने दोन्ही डावात चांगली गोलंदाजी केली. पहिल्या डावात 2 तर दुसऱ्या डावातही 2 विकेट घेतला आहे.