AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG 5th T20i : इंडिया-इंग्लंड पाचवा सामना, मॅचच्या वेळेत बदल? किती वाजता सुरुवात?

India vs England 5th T20i Live And Digital Streaming: टीम इंडिया मायदेशातील टी 20i मालिकेतील पाचवा आणि अंतिम टी 20i सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. जाणून घ्या मॅचला किती वाजता सुरुवात होणार?

IND vs ENG 5th T20i : इंडिया-इंग्लंड पाचवा सामना, मॅचच्या वेळेत बदल? किती वाजता सुरुवात?
india vs england t20i series 2025Image Credit source: Bcci
| Updated on: Feb 02, 2025 | 7:51 AM
Share

टीम इंडिया सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी 20i सामन्यात इंग्लंडवर विजय मिळवला. टीम इंडियाने 31 जानेवारीला पुण्यातील एमसीए स्टेडियममध्ये रंगतदार सामन्यात इंग्लंडवर 15 धावांनी मात करत मालिका जिंकली. टीम इंडियाने पुण्यातील विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी निर्विवाद आघाडी घेतली. टीम इंडियाचा हा पुण्यातील तिसरा टी 20i विजय ठरला. त्यानंतर आता दोन्ही संघ या मालिकेतील पाचव्या आणि अंतिम सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. या पाचव्या सामन्याबाबत जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पाचवा टी 20i सामना केव्हा?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पाचवा टी 20i सामना रविवारी 2 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पाचवा टी 20i सामना कुठे?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पाचवा टी 20i सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पाचव्या टी 20i सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पाचव्या टी 20i सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पाचवा टी 20i सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पाचवा टी 20i सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पाचवा टी 20i सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पाचवा टी 20i सामना मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपवरुन पाहायला मिळेल.

इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि वॉशिंगटन सुंदर.

टी 20 सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कर्णधार) रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गुस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.