Abhishek Sharma : “मला वाटलं की…”, कॅप्टन सूर्यकुमार अभिषेकच्या खेळीबाबत असं का म्हणाला?

Suryakumar Yadav On Abhishek Sharma : अभिषेक शर्मा हा इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी 20i सामन्यातील विजयाचा शिल्पकार ठरला. टीम इंडियाच्या या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव याने अभिषेकच्या या खेळीबाबत काय म्हटलं.

Abhishek Sharma : मला वाटलं की..., कॅप्टन सूर्यकुमार अभिषेकच्या खेळीबाबत असं का म्हणाला?
Suryakumar yadav On Abhishek Sharma Century ind vs eng 5th 20i
| Updated on: Feb 03, 2025 | 8:09 AM

टीम इंडियाने इंग्लंडवर पाचव्या टी 20i सामन्यात 150 धावांनी धुव्वा उडवला. टीम इंडियाने विजयासाठी दिलेल्या 248 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा 97 धावांवर बाजार उठला. टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांची मालिका 4-1 अशा एकतर्फी फरकाने जिंकला. युवा सलामीवीर अभिषेक शर्मा हा टीम इंडियाच्या विजयाचा नायक ठरला. अभिषेकने 13 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 135 धावांची तोडफोड खेळी केली. तसेच अभिषेकने 2 विकेट्सही घेतल्या. कॅप्टन सूर्यकुमार यादव याने अभिषेकच्या या कामगिरीचं कौतुक केलं. तसेच मुंबईकर ऑलराउंडर शिवम दुबे तसेच मोहम्मद शमी या दोघांनी घेतलेल्या प्रत्येकी 2-2 विकेट्सचाही उल्लेख केला.

सूर्यकुमार यादव काय म्हणाला?

“ही रणनिती नव्हती. मात्र मैदानात तडकाफडकी निर्णय घेतला कारण मला वाटलं की ते विकेट्स घेऊ शकतात आणि त्यांनी तसंच केलं”, असं सूर्याने शिवम दुबे आणि अभिषेक शर्मा या दोघांकडून बॉलिंग करुन घेण्याबाबत म्हटलं.

अभिषेकच्या शतकी खेळीबाबत प्रतिक्रिया काय?

“त्याची (अभिषेक) खेळी पाहून मला मजा आली. त्याचं कुटुंब इथे उपस्थित आहे आणि मला विश्वास आहे की सर्वांनाच त्याची खेळी पाहून मजा आली असेल”, असा विश्वास, सूर्याने या वेळेस व्यक्त केला. अभिषेक टीम इंडियाकडून टी 20i क्रिकेटमध्ये रोहित शर्मा याच्यानंतर वेगवान शतक करणारा दुसरा फलंदाज ठरला. अभिषेकचा या स्फोटक खेळीसाठी सामनावीर पुस्कराने गौरवण्यात आलं.

अभिषेक शर्मा ‘मॅन ऑफ द मॅच

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन: सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती.

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन: जोस बटलर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वूड.