IND vs ENG, 3rd ODI: भारत आणि इंग्लंडसाठी ‘करो या मरो’ची लढाई, कौल इंग्रजांनी जिंकला आणि…

India vs England 3rd ODI: भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना होत आहे. या मालिकेत 1-1 अशी बरोबरी असल्याने या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. त्यामुळे आता शेवटचा सामना जिंकून मालिका कोण खिशात घालतं? याकडे लक्ष लागून आहे.

IND vs ENG, 3rd ODI: भारत आणि इंग्लंडसाठी करो या मरोची लढाई, कौल इंग्रजांनी जिंकला आणि...
Image Credit source: BCCI
| Updated on: Jul 19, 2026 | 3:13 PM

भारत आणि इंग्लंड वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात आमनेसामने आले आहे. या सामना निर्णायक असल्याने महत्त्व वाढलं आहे. मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला होता, तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने कमबॅक केलं. त्यामुळे मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. त्यामुळे शेवटच्या सामन्यात विजयी होणारा संघ मालिका खिशात घालणार आहे. असं असताना तिसऱ्या वनडे सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या पारड्यात पडला. इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक म्हणाला की, आज आम्ही फलंदाजी करणार आहोत. खेळपट्टी चांगली दिसतेय. साकिब महमूद गोलंदाजीसाठी परत आला आहे. रुट ज्या पद्धतीने फलंदाजी करतो, तो एक उत्तम आदर्श आहे. मालिका जिंकण्याच्या संधीवर हॅरी ब्रूक म्हणाला की, हो, ते खूप सुंदर असेल, नाही का? आशा आहे की दिवसाच्या शेवटी आम्ही ती ट्रॉफी उचलू, पण आम्हाला तिथे जाऊन परिस्थितीचा शक्य तितका अंदाज घ्यावा लागेल आणि त्यानुसार जुळवून घ्यावे लागेल.

टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिल म्हणाला की, आम्ही प्रथम गोलंदाजी करत होतो. आम्ही संघात तीन बदल केले आहेत. बुमराह गुडघ्याच्या दुखापतीमुळे उपलब्ध नाही आणि वॉशिंग्टन सुंदरसुद्धा. दुबेसुद्धा संघात नाही. केएल संघात, प्रिन्स यादव संघात आणि अर्शदीप संघात परत आले आहेत.अर्शदीप सिंगच्या निवडीवर शुबमन गिलने स्पष्ट केलं की, आम्ही आकडेवारीवर जास्त अवलंबून राहत नाही. आम्हाला वाटते की तो एक उत्कृष्ट गोलंदाज आहे आणि या मैदानावर आम्ही चार वेगवान गोलंदाजांच्या शोधात होतो. आम्ही पाहिले आहे की मधल्या षटकांमध्ये, वेगवान गोलंदाजांच्या तुलनेत फिरकी गोलंदाज फारशी कामगिरी करत नाहीत.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), विराट कोहली, इशान किशन, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल, गुरनूर ब्रार, प्रिन्स यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा.

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): बेन डकेट, जेकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रुक (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), सॅम करन, विल जॅक्स, गस ऍटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, जोश टंग

Follow Us