IND vs ENG: टीम इंडियाला वनडे सीरिजआधी तगडा धक्का; दिग्गज खेळाडू 2 सामन्यांतून आऊट!
India vs England Odi Series 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तोंडावर इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकदिवसीय मालिका होत आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे.

भारतीय क्रिकेट संघ टी 20i मालिकेनंतर आता इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. टीम इंडिया इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये एकूण 3 सामने खेळणार आहे. टीम इंडियाची ही आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 नंतरची एकूण तिसरी तर 2025 या वर्षातील पहिली एकदिवसीय मालिका आहे. या मालिकेतील पहिला सामना हा नागपूरमधील व्हीसीए स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर जोस बटलरच्या खांद्यावर इंग्लंडची धुरा आहे. टीम इंडियाने नागपुरात सरावाला सुरुवात केली आहे. मात्र त्याआधी एक वाईट बातमी समोर आली आहे.
बीसीसीआय निवड समितीने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी एकत्र संघ जाहीर केला. दोन्ही संघ सारखेच आहेत. फरक इतकाच आहे ती वनडे सीरिजमध्ये बुमराह खेळणार नाहीय. मिळालेल्या माहितीनुसार, टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यांमध्ये खेळणार नसल्याचं म्हटलं जात आहे.
जसप्रीत बुमराह याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात दुखापत झाली होती. बुमराहला या दुखापतीमुळे सामना सोडून मैदानाबाहेर जावं लागलं होतं. बुमराहला पाठीत झालेल्या त्रासमुळे दुसऱ्या डावात बॉलिंगही करता आली नव्हती. त्यानंतर आता बुमराह स्कॅनसाठी आणि या दुखापतीतून पूर्णपणे फिट होऊन कमबॅक करण्यासाठी एनसीए अर्थात नॅशनल क्रिकेट एडेकमीत गेला आहे. दुखापत झाल्यानंतर भारतीय खेळाडूंना रिहॅबसाठी एनसीएत जावं लागतं. तिथे खेळाडूंवर आवश्यक उपचार दिले जातात. खेळाडूंवर वैद्यकीय पथक लक्ष देतं. सर्वकाही व्यवस्थित झाल्यावर खेळाडूला एका टेस्ट द्यावी लागते त्यानंतर एनसीएकडून खेळाडू पूर्णपणे फिट असल्याचं जाहीर करते.




बुमराहच्या जागी कोण?
बुमराह पहिल्या 2 सामन्यांमध्ये खेळणार नसल्याचं आगरकर यांनी निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी सांगितलं होतं.मात्र त्यानंतरही बुमराह इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी फिट नसूनही त्याचा संघात समावेश करण्यात आला. बीसीसीआय निवड समितीने बुमराहचा बॅकअप म्हणून हर्षित राणा याचा एकदिवसीय संघात समावेश केला होता.
वनडे सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कॅप्टन), जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि हर्षित राणा (बुमराहचा बॅकअप).