IND vs ENG : पहिल्या कसोटी सामन्यासाठी अशी आहे प्लेइंग 11, करुण-सुदर्शनबाबत शुबमन गिल म्हणाला…

अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी मालिकेतील पहिला सामना लीड्सच्या हेडिंग्ले मैदानात होत आहे. या मालिकेत शुबमन गिलच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. इंग्लंडच्या भूमीवर पहिल्या कसोटीसाठी कर्णधार शुबमन गिलने प्लेइंग 11 निवडताना काळजी घेतली आहे. 8 वर्षानंतर करूण नायरचं कमबॅक झालं आहे.

IND vs ENG : पहिल्या कसोटी सामन्यासाठी अशी आहे प्लेइंग 11, करुण-सुदर्शनबाबत शुबमन गिल म्हणाला...
शुबमन गिल
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 20, 2025 | 3:06 PM

भारत इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर कसोटी मालिकेचा पहिला सामना लीड्सच्या हेंडिग्ले मैदानात सुरु झाला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर कर्णधार बेन स्टोक्सने प्रथमगोललंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडने भारतीय गोलंदाजीचा प्रभाव पाहून प्रथम गोलंदाजी निवडली. खेळपट्टीवर थोडा ओलावा दिसत असल्याने गोलंदाजीचा सामना करणं टीम इंडियाला कठीण जाईल असं वाटते. त्यामुळे टीम इंडियासमोर पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारण्याचं आव्हान असणार आहे. भारतीय संघ स्ट्राँग बॅटिंग लाईनअप निवडला गेला आहे. फक्त या प्लेइंग 11 मध्ये अनुभवाची उणीव आहे. पण फलंदाजांनी चांगली कामगिरी केली तर इंग्लंडचं विजयाचं गणित कठीण होणार आहे. दरम्यान, या संघात 8 वर्षानंतर करूण नायरचं कमबॅक झालं आहे. करूण नायर शेवटचा कसोटी सामना 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. 33 वर्षीय करुण नायरने इंग्लंड लायन्सविरुद्ध्या अनऑफिशियल कसोटी सामन्यात भारत ए कडून चांगली कामगिरी केली होती. करुण नायर 6 कसोटी सामना खेळला असून 7 डावात त्याने 374 धावा केल्या आहेत. यात 303 धावांची सर्वोत्तम खेळी आहे. आता सहाव्या क्रमांकावर त्याला फलंदाजीची संधी मिळणार आहे.

दुसरीकडे, साई सुदर्शनचं कसोटी संघात पदार्पण झालं आहे. भारतीय संघात कसोटी खेळणारा 317 वा खेळाडू ठरला आहे. त्याच्या क्रिकेट कारकि‍र्दीतला पहिला कसोटी सामना आहे. साई सुदर्शन गुजरात टायटन्समध्ये शुबमन गिलचा सहकारी राहिला आहे. तसेच आयपीएल 2025 स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्याचा फॉर्म पाहता शुबमन गिलने त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी दिली आहे. साई सुदर्शन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरेल. तर चौथ्या क्रमांकावर कर्णधार शुबमन गिल उतरणार आहे.

काय म्हणाला शुबमन गिल?

‘मीही प्रथम गोलंदाजी केली असती, पहिल्या सत्रात थोडे कठीण असू शकते पण नंतर फलंदाजी करणे चांगले असायला हवे होते. सूर्य बाहेर आहे, आमच्यासाठी चांगली फलंदाजी असायला हवी. तयारी अद्भुत होती, आम्ही बेकेनहॅममध्ये सराव सामना खेळलो, खेळाडूंना खूप छान वाटत आहे. साई सुदर्शन पदार्पण करत आहे, करुणचं कमबॅक झालं आहे. साई तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल.’, असं शुबमन गिल याने सांगितलं.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर