
टीम इंडियासाठी इंग्लंड दौरा कायमच आव्हानात्मक राहिला आहे. इंग्लंडच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजांसमोर टीम इंडियाच्या फलंदाजांना अग्निपरीक्षा द्यावी लागली आहे. भारताच्या फलंदाजांना यंदाही या आव्हानाचा सामना कारयचा आहे. टीम इंडियाने 1932 साली पहिल्यांदा इंग्लंड दौरा केला होता. तेव्हापासून ते गेल्या इंग्लंड दौऱ्यापर्यंत टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवण्यासह अनेक विक्रमही केले आहेत. टीम इंडियाच्या यंदाच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात 20 जूनपासून होत आहे. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामने खेळणार आहे. टीम इंडिया शुबमन गिल याच्या नेतृत्वात आणि हेड कोच गौतम गंभीर याच्या मार्गदर्शनात इंग्लंड विरुद्ध 2 हात करणार आहे. गंभीर-गिल या जोडीला गेल्या 18 वर्षांमध्ये इतर भारतीय कर्णधार आणि प्रशिक्षकांना जे जमलं नाही, ते करुन दाखवण्याची संधी आहे. टीम इंडियाला इंग्लंड विरुद्ध त्यांच्याच घरात कसोटी मालिका जिंकण्यासाठी फार संघर्ष करावा लागला आहे. टीम इंडियाने इंग्लंडमध्ये 18 वर्षांपूर्वी शेवटची कसोटी मालिका जिंकली...