IND vs IRE Live Streaming: टीम इंडियासमोर सलामीच्या सामन्यात आयर्लंडचं आव्हान
india vs ireland T20 World Cup 2024 Live Match Score: टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील आपला पहिला सामना खेळणार आहेत.

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया आपला पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात आयर्लंड विरुद्ध करणार आहे. पॉल स्टर्लिंग याच्याकडे आयर्लंडची धुरा आहे. तर हिटमॅन रोहित शर्मा टीम इंडियाची कॅप्टन्सी करणार आहे. दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना असणार आहे. टीम इंडियाच्या तुलनेत आयर्लंड फारशी मजबूत नाही. मात्र आयर्लंड उलटफेर करण्यात पटाईत आहे. त्यामुळे टीम इंडियाला आयर्लंडला हलक्यात घेऊन जमणार नाही. टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड यांच्यातील सामना केव्हा आणि कुठे होणार, हे जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड सामना केव्हा?
टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड सामना 5 जून रोजी खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड सामना कुठे?
टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड सामना नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क येथे होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होईल. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळणार?
टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?
टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड सामना मोबाईलवर फुकटात डिज्ने प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
आयसीसी टी 20 वर्ल्ड कपसाठी आयर्लंड टीम : पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), मार्क अडायर, रॉस अडायर, अँड्र्यू बालबिर्नी, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, ग्रॅहम ह्यूम, जोशुआ लिटल, बॅरी मॅकार्थी, नील रॉक, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, बेन व्हाइट आणि क्रेग यंग.
