
भारताचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्मा याने नववर्षात एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात इतिहास घडवला. रोहितने न्यूझीलंड विरुद्ध 26 धावांच्या खेळीत 3 चौकार आणि 2 षटकार लगावले. रोहितने यासह 2 वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केले. रोहितने यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 650 सिक्सचा वर्ल्ड रेकॉर्ड केला. सोबतच रोहितने वनडेत ओपनर म्हणून ख्रिस गेल याचा सर्वाधिक सिक्सचा विक्रम मोडीत काढला. त्यानंतर आता रोहितला तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी आहे.
न्यूझीलंडने पहिल्या सामन्यातील पराभवानंतर दुसऱ्या सामन्यात मुसंडी मारत राजकोटमध्ये भारतावर मात केली. त्यामुळे मालिका 1-1 ने बरोबरीत झाली. त्यामुळे आता तिसरा आणि निर्णायक सामना हा रंगतदार होणार आहे. तिसरा सामना हा इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये 19 जानेवारीला होणार आहे.
रोहितला पहिल्या 2 सामन्यांत मोठी खेळी करण्यात अपयश आलं. रोहितने अनुक्रमे 26 आणि 24 धावा केल्या. त्यामुळे रोहितला इंदूरमध्ये मोठी खेळी करुन शाहिद आफ्रिदीच्या नावावर वनडेत न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिक षटकारांचा असलेला वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढण्याची संधी आहे. तसेच रोहितने 2 वर्षांपूर्वी इंदूरमध्ये न्यूझीलंड विरुद्धच 101 धावांची खेळी केली होती. त्यामुळे ट्रॅक रेकॉर्ड पाहता रोहित पुन्हा एकदा न्यूझीलंड विरुद्ध धुलाई करु शकतो.
पाकिस्तानचा माजी ऑलराउंडर शाहिद आफ्रिदी याच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिक सिक्स लगावण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. अफ्रिदीने न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिक 50 शतकं झळकावली आहेत. तर रोहित अफ्रिदीच्या या वर्ल्ड रेकॉर्डपासून फक्त 2 सिक्सने दूर आहे. रोहितच्या नावावर 49 शतकं आहेत. त्यामुळे रोहित इंदूरमध्ये 2 फटके लगावताच आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर करेल.
रोहित आतापर्यंत इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये एकूण 5 एकदिवसीय सामने खेळला आहे. रोहितने या 5 सामन्यांमध्ये 205 धावा केल्या आहेत. रोहितने या मैदानात 1 शतकही केलंय. तसेच रोहितने या मैदानात 10 षटकार आणि 18 चौकारही लगावले आहेत. त्यामुळे आता रोहित इंदूरमध्ये पुन्हा शतक करत न्यूझीलंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेचा अप्रतिम शेवट करण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.