AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित-इशानची धडाकेबाज सुरुवात, दीपक चाहरकडून स्ट्राँग फिनिश, भारताचं न्यूझीलंडला 185 धावांचं आव्हान

सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशनने आक्रमक पवित्रा घेतला होता. दोघांनी जोरदार फटकेबाजी करत पॉवर प्लेमध्ये 69 धावा कुटल्या. 6 व्या षटकात या जोडीने 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 20 धावा फटकावल्या.

रोहित-इशानची धडाकेबाज सुरुवात, दीपक चाहरकडून स्ट्राँग फिनिश, भारताचं न्यूझीलंडला 185 धावांचं आव्हान
Rohit sharma
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Nov 21, 2021 | 9:10 PM
Share

कोलकाता : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज कोलकाता येथील ऐतिहासिक स्टेडियम ईडन गार्डन्सवर खेळवला जात आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला घेतला होता. हा निर्णय त्याने आणि इशान किशनने योग्य ठरवला. सलामीच्या जोडीने अवघ्या 6.2 षटकात 69 धावांची सलामी दिली. मधल्या षटकांमध्ये भारताची फलंदाजी ढेपाळली, मात्र हर्षल पटेल आणि दीपक चाहरने अखेरच्या षटकात चांगली फटकेबाजी करुन भारताला 184 धावांपर्यत मजल मारुन दिली. दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडकडून मिचेल सँटनरने उत्कृष्ट गोलंदाजी केली, त्याने 3 षटकात 27 धावा देत 3 बळी घेतले. तसेच अॅडम मिल्ने, इश सोढी आणि लॉकी फर्ग्युसनने प्रत्येकी एक विकेट घेतली. (IND vs NZ 3rd T20 : Rohit Sharma’s half century, India challenge New Zealand 185 runs)

सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशनने आक्रमक पवित्रा घेतला होता. दोघांनी जोरदार फटकेबाजी करत पॉवर प्लेमध्ये 69 धावा कुटल्या. 6 व्या षटकात या जोडीने 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 20 धावा फटकावल्या. सातव्या षटकात किशन 29 धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ सूर्यकुमार यादव (0) आणि ऋषभ पंत (4) झटपट बाद झाले. दरम्यान, रोहितने जोरदार फटकेबाजी करत 27 चेंडूत अर्धशतक फटकावलं. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 3 षटकार लगावले. मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर चौकार लगावत त्याने अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर रोहित 56 धावा करुन रोहित माघारी परतला. इश सोढीने स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल घेत रोहितला पव्हेलियनचा रस्ता दाखवला.

रोहित बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि वेंकटेश अय्यरने भारताचा डाव सावरला, मात्र दोघांनाही मोठी खेळी करता आली नाही. श्रेयस 25 आणि वेंकटेश 20 धावा करुन माघारी परतले. अखेरच्या षटकांमध्ये हर्षल पटेल (18) आणि दीपक चाहरने (21) जोरदार फटकेबाजी करत भारताला 180 चा टप्पा पार करुन दिला.

किशन, चहलचं पुनरागमन

टीम इंडियाने जयपूर आणि रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या टी-20 मध्ये विजय मिळवून मालिकेवर कब्जा केला आहे. अशा परिस्थितीत आज रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि राहुल द्रविडच्या कोचिंगमध्ये खेळणाऱ्या टीम इंडियाच्या नजरा किवी संघाला व्हाईटवॉश देण्यावर असतील. भारताने आजच्या सामन्यात आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत, भारतीय संघाने केएल राहुल आणि आर. अश्विनला विश्रांती दिली आहे. त्यांच्या जागी इशान किशन आणि युजवेंद्र चहलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. टीम साऊदीच्या जागी लॉकी फर्ग्युसनला न्यूझीलंड संघात स्थान मिळाले आहे. न्यूझीलंड संघाने कर्णधार बदलला आहे. तिसर्‍या आणि शेवटच्या T20 मध्ये न्यूझीलंडची कमान मिचेल सँटनरच्या हातात आहे. यापूर्वी टिम साऊदी संघाची धुरा सांभाळत होता.

इतर बातम्या

हार्दिक पंड्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे खुले, मात्र दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी एक अट पूर्ण करावी लागणार

महेंद्रसिंह धोनी शेवटचा सामना चेन्नईमध्ये खेळणार ? कार्यक्रमात बोलताना म्हणाला…

VIDEO: मूर्ती लहान पण किर्ती महान, केवाय वेंकटेश यांचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रपती उतरले मंचावरुन खाली

(IND vs NZ 3rd T20 : Rohit Sharma’s half century, India challenge New Zealand 185 runs)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या