
टीम इंडियाचा विकेटकीपर आणि ओपनर बॅट्समन संजू सॅमसन न्यूझीलंड विरूद्धच्या 5 सामन्याच्या टी 20i मालिकेतील पहिल्या 4 सामन्यात फ्लॉप ठरला. संजूला या 4 सामन्यात मोठी खेळता करता आली नाही. टीम मॅनेजमेंटने संजूला अपयशानंतरही संधी देत विश्वास दाखवला.मात्र संजू विश्वात जिंकण्यात अपयशी ठरला. आता उभयसंघातील पाचवा आणि अंतिम सामना हा 31 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. संजू सॅमसन याला या पाचव्या सामन्यातून प्लेइंग ईलेव्हनमधून डच्चू देण्यात येणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.