
टीम इंडियाला नववर्षातील पहिल्या एकदिवसीय सामन्याआधी मोठा झटका लागला. उभयसंघातील पहिला सामना 11 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधी भारतीय संघाचा अनुभवी विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याला दुखापतीमुळे न्यूझीलंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे भारताला मोठा फटका बसला आहे. त्यानंतर आता बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने पंतच्या जागी एकदिवसीय मालिकेसाठी युवा खेळाडूचा भारतीय समावेश केला आहे. बीसीसीआयने पंतच्या जागी ध्रुव जुरेल याला संधी दिली आहे. बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे आता ध्रुवला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडिया शनिवारी 10 जानेवारीला सराव करत होती. ऋषभ पंत याला बॅटिंगचा सराव करताना पोटाच्या उजव्या बाजूला अचानक त्रास जाणवू लागला. त्यामुळे क्षणाचा विलंब न करता पंतवर वैदकीय उपचार करण्यात आले. पंतला नक्की काय झालंय हे जाणून घेण्यासाठी एमआरआय करण्यात आला. त्यानंतर पंतला साईड स्ट्रेन झाल्याचं स्पष्ट झालं, अशी माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे.
पंतला मालिकेच्या काही तासांआधी झालेल्या दुखापतीमुळे मालिकेतून माघारी घ्यावी लागली. त्यामुळे ध्रुवला संधी मिळाली आहे. ध्रुव काही आठवड्यांआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेचा भाग होता.
ध्रुवने आतापर्यंत भारतीय संघाचं 9 कसोटी आणि 4 टी 20i सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. मात्र ध्रुवला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली नाहीय. त्यामुळे ध्रुवला या मालिकेत पदार्पणाची प्रतिक्षा असणार आहे.
ध्रुवने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत 2025-2026 या मोसमात उत्तर प्रदेशसाठी 7 डावात 93 च्या कडक सरासरीने 558 धावा केल्या आहेत. ध्रुवने या दरम्यान 2 शतकं आणि 4 अर्धशतकं झळकावली आहेत.ध्रुवने या खेळीसह उतर प्रदेशला उपांत्य पूर्व फेरीत पोहचवण्यात प्रमुख भूमिका बजावली.
ध्रुव जुरेलचा एकदिवसीय मालिकेसाठी समावेश
🚨 NEWS 🚨
Rishabh Pant ruled out of #INDvNZ ODI series; Dhruv Jurel named replacement.
Details 🔽 #TeamIndia | @IDFCFIRSTBankhttps://t.co/3hKb7Kdup2
— BCCI (@BCCI) January 11, 2026
न्यूझीलंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा सुधारित संघ : शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, यशस्वी जायसवाल, केएल राहुल (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसि कृष्णा, कुलदीप यादव, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), नीतीश कुमार रेड्डी आणि अर्शदीप सिंह.