Ind vs New Zealand : पहिल्या वनडेपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका, दुखापतीमुळे अव्वल स्टार खेळाडू बाहेर; आता..
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरूवात होत असून पहिल्या मॅचपूर्वीच भारताला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू हा दुखापतीमुळे संघाबाहेर गेला असून टीम इंडियासाठी ही वाईट बातमी मानली जात आहे.

भारत वि. न्युझीलंडच्या वनडे सीरिजची क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट बघत आहेत. स्टार फलंदात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा तूफान खेळ पाहण्यास सगळेचे उत्सुक आहेत. मात्र न्युझीलंड विरुद्धच्या पहिल्या मॅचपूर्वीच टीम इंडियाला (Team India) मोठा झटका बसला आहे. त्याचं कारण म्हणजे भारताचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत. त्याच्या दुखपती कमी होण्याचं नावचं नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेच्या सुरुवातीपूर्वी पंतला दुखापत झाली. शनिवारी, बडोदा क्रिकेट असोसिएशन (बीसीए) स्टेडियमवर नेट प्रॅक्टिस करत असतानाचा एक चेंडू ऋषभच्या शरीरावर आदळला, ज्यामुळे त्याला दुखापत झाली असून त्यामुळेच त्याला आता संघातून बाहेर पडावं लागलं असून न्युझीलंडविरुद्धच्या मालिकेत तो सामने खेळू शकणार नाहीये.
ऋषभ पंत ODI मधून बाहेर
टीम इंडियाच्या ऑप्शनल प्रॅक्टिस सेशनदरम्यान काल ऋषभ पंतला दुखापत झाली. थ्रोडाऊन स्पेशालिस्टविरुद्ध फलंदाजी करताना, त्याला कंबरेजवळ (कंबरेजवळ) दुखापत झाली आणि त्यानंतर तो मैदानाबाहेर गेला. क्रिकबझच्या एका वृत्तानुसार, या जदुखापतीमुळे ऋषभ पंत आता या मालिकेत सहभागी होऊ शकणार नाही. केएल राहुल नंतर दुसरा यष्टीरक्षक म्हणून त्याला भारतीय एकदिवसीय संघात स्थान देण्यात आलं होतं. मात्र आता दुखापतीमुळे त्याचाच पत्ता कट झाला आहे. पण त्यामुळे संघाला लवकरच बदलीची आवश्यकता नाही. असं असलं तरी येत्या काही दिवसांत सिलेक्टर्सकडून ऋषभ पंतऐवजी दुसऱ्या खेळाडूचा (रिप्लेसमेंट) घोषणा होऊ शकते.
पंतची दुखापत ही त्याच्या सततच्या तंदुरुस्तीच्या समस्यांचे आणखी एक उदाहरण आहे. त्याला यापूर्वी अनेक वेळा दुखापत झाली असून बरं व्हायलाही वेळ लागला आहे. 2025 च्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान पंतलाही दुखापत झाली होती. त्यानंतर मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवशी उजव्या पायाच्या दुखापतीमुळे त्याला मालिकेतून बाहेर काढण्यात आले. यामुळे तो काही काळ क्रिकेट मैदानापासून दूर राहिला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी तो संघात परतला. पण आता त्याला पुनहा दुखापत झाली आहे.
कोणाला मिळणार संधी ?
पंतच्या दुखापतीमुळे एकदिवसीय संघात त्याची जागा आता ईशान किशन घेऊ शकतो, ज्याला टी-20 मालिकेसाठी संघातही स्थान देण्यात आले आहे. ईशान किशनची अलीकडील कामगिरी खूपच दमदार आहे, ज्यामुळे 2026 च्या टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या संघात त्याची निवड करण्यात आली होती.
