
नागपूर, रायपूरनंतर आता भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टी 20i मालिकेतील तिसऱ्या सामन्याचा थरार हा गुवाहाटीत रंगणार आहे. उभसंघात एकूण 5 सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. भारताने मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात न्यूझीलंडला पराभवाचं पाणी पाजलं. भारताने दोन्ही सामने एकतर्फी फरकाने जिंकत आपला दबदबा कायम राखला. टीम इंडिया या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. आता तिसरा टी 20i सामना कधी आणि कुठे पाहायला मिळणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी 20i सामना रविवारी 25 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी 20i सामना गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी 20i सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी 20i सामना हा टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी 20i सामना मोबाईलवर जियोहॉटस्टार एपवर लाईव्ह पाहायला मिळेल.
दरम्यान तिसऱ्या टी 20i सामन्यात टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन याला पु्न्हा संधी मिळणार का? असा प्रश्न आता क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. संजूला निवड समितीने नागपूर आणि त्यानंतर रायपूरमध्ये झालेल्या दोन्ही टी 20i सामन्यातील प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी दिली. मात्र संजूने दोन्ही सामन्यात बॅटिंगने घोर निराशा केली. अशात आता टीम मॅनेजमेंट संजूला सलग तिसऱ्या सामन्यात संधी देत पुन्हा विश्वास दाखवणार की त्याचा पत्ता कट होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.