
न्यूझीलंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पराभव विसरुन टीम इंडिया आता नव्या आव्हानसाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध वनडेनंतर टी 20i सीरिज खेळणार आहे. भारताची ही 2026 या वर्षातील पहिली आणि टी 20i वर्ल्ड कपआधीची शेवटची मालिका आहे. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांसाठी ही मालिका फार महत्त्वाची आहे. या मालिकेत एकूण 5 टी 20i सामने खेळवण्यात येणार आहेत. मालिकेतील सलामीचा सामना हा कधी आणि कुठे होणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला टी 20i सामना बुधवारी 21 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला टी 20i सामना नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या टी 20i सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला टी 20i सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला टी 20i सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहता येईल.
सूर्यकुमार यादव टी 20i मालिकेत भारताचं नेतृत्व करणार आहे. मिचेल सँटनर याच्या खांद्यावर न्यूझीलंडच्या नेतृत्वाची धुरा आहे. अशात आता टीम इंडिया विजयी सलामी देत नववर्षातील पहिला टी 20i सामना जिंकण्यात यशस्वी ठरणार की किवी मैदान मारणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
दरम्यान विकेटकीपर फलंदाज इशान किशन न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या सामन्यातील प्लेइंग ईलेव्हनमध्ये असणार हे निश्चित आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव यानेच ही माहिती दिली आहे.अशात आता इशान हा तिलक वर्मा याच्या जागी खेळताना कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तिलक वर्मा याला दुखापतीमुळे पहिल्या 3 टी 20i सामन्यातून बाहेर व्हावं लागलंय.