AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK | आज आशिया कप 2023 मधील सर्वात मोठी मॅच, भारत-पाकिस्तान सामना, इथे पहा Live

IND vs PAK | भारत आणि पाकिस्तानची टीम क्रिकेटच्या मैदानात आज आमने-सामने असतील. इमर्जिंग एशिया कपची फायनल मॅच 23 जुलैला दुपारी 2 वाजल्यापासून सुरु होणार आहे.

IND vs PAK | आज आशिया कप 2023 मधील सर्वात मोठी मॅच, भारत-पाकिस्तान सामना,  इथे पहा Live
Asia Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान अंतिम सामन्यात आज आमनेसामने, कधी आणि कुठे पाहाल सामना वाचा
| Updated on: Jul 23, 2023 | 9:34 AM
Share

नवी दिल्ली : क्रिकेट चाहते एसीसी इमर्जिंग आशिया कप 2023 च्या फायनलची आतुरतेने वाट पाहतायत. आतापर्यंत भारत ए ने या स्पर्धेत दमदार प्रदर्शन केलं आहे. रविवारी परंपरागत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध फायनल मॅच होणार आहे. कॅप्टन यश ढुले आणि मोहम्मद हॅरिस आमने-सामने असतील. भारत ए ने ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तान ए ला पराभूत केलं होतं.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात विजेतेपदाचा प्रबळ दावेदार कोण? हे छातीठोकपणे सांगता येणार नाही. भारत ए चा फॉर्म लक्षात घेता, त्यांना विजेतेपदासाठी पसंती दिली जात आहे.

कोणाच मनोबल उंचावलेलं असेल?

फायनल खेळताना भारत ए च मनोबल उंचावलेल असेल. कारण त्यांनी लीग स्टेजमध्ये पाकिस्तानला हरवलं होतं. भारतीय खेळाडूंना फक्त अतिआत्मविश्वास नडू शकतो. बांग्लादेश विरुद्ध सामन्यात एकाक्षणी भारतीय टीम अडचणीत होती. भारताच्या सर्वच खेळाडूंनी आतापर्यंत योगदान दिलं आहे. पाकिस्तान विरुद्ध ते हेच प्रदर्शन कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील.

कुठे पाहता येणार फायनल सामना?

इमर्जिंग एशिया कपची फायनल मॅच 23 जुलैला दुपारी 2 वाजल्यापासून सुरु होणार आहे. भारतात मॅचची लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही फॅनकोड App वर पाहू शकता. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सुद्धा लाइव्ह प्रसारण पाहू शकता. भारत ए विरुद्ध पाकिस्तान ए मध्ये सामना कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

दोन्ही टीम्सचे स्क्वॉड-

भारत ए : साई सुदर्शन, अभिषेक शर्मा, निकिन जोस, यश ढुल (कॅप्टन), निशांत सिंधु, रियान पराग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), हर्षित राणा, मानव सुथार, आरएस हंगरगेकर, युवराज सिंह डोडिया, प्रभसिमरन सिंह, आकाश सिंह, नितीश रेड्डी, प्रदोष पॉल. पाकिस्तान ए : सईम अयूब, साहिबजादा फरहान, ओमैर यूसुफ, तैयब ताहिर, कासिम अकरम, मोहम्मद हॅरिस (विकेटकीपर/कॅप्टन), मुबासिर खान, अमद बट, मोहम्मद वसीम जूनियर, सुफियान मुकीम, अरशद इकबाल, हसीबुल्लाह खान, मेहरान मुमताज, कामरान गुलाम.

Follow Us
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
CM Devendra Fadnavis : दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, खात्यांत 5 हजार रुपये जमा; मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश.....
Sharad Pawar : शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही ठणठणीत राहा
बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला...
Beed : बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला, चालकाचा होरपळून मृत्यू
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र...
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र, जरांगे पुरावे देणार
महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप....
Mahayuti : महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप, शीतल म्हात्रेंची पोस्ट चर्चेत