IND vs PAK: “टीमसाठी खेळा, स्वत:साठी नाही”, माजी दिग्गजाचा संदेश, व्हीडिओ व्हायरल

India vs Pakistan: टीम इंडिया-पाकिस्तान सामन्याआधी दिग्गज माजी गोलंदाजाने टीमसाठी खास संदेश दिला आहे. जाणून घ्या काय म्हटलंय?

IND vs PAK: टीमसाठी खेळा, स्वत:साठी नाही, माजी दिग्गजाचा संदेश, व्हीडिओ व्हायरल
babar azam and rohit sharma pak vs ind
Image Credit source: pcb
| Updated on: Jun 09, 2024 | 6:52 PM

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 18 व्या सामन्यात क्रिकेट विश्वातील कट्टर आणि ए ग्रुपमधील टीम इंडिया आणि पाकिस्तान आमनेसामने आहेत. या सामन्याचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. सामना सुरु होण्यासाठी अवघी काही मिनिटं बाकी आहेत. या महामुकाबल्याच्या काही तासांआधी दिग्गज गोलंदाजाने टीमसाठी महत्त्वाचा संदेश दिला आहे. टीमसाठी खेळा, स्वत:साठी नाही, असा संदेश या दिग्गज माजी गोलंदाजाने व्हीडिओद्वारे दिला आहे.

शोएब अख्तरचा पाकिस्तानला संदेश

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज रावलपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तर याने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. शोएबने या 57 सेकंदांच्या व्हीडिओत पाकिस्तानला संदेश दिलाय. “मी प्री मॅचसाठी स्टुडियोत चाललोय. पाकिस्तानसाठी खेळा, स्वत:साठी नाही. वैयक्तिक विक्रमासाठी खेळू नका. वैयक्तिक विक्रम लक्षात राहत नाही”, असं शोएबने म्हटलं. तसेच शोएबने काही उदाहरणं देत चाहते कशाप्रकारे मॅचविनिंग खेळी लक्षात ठेवतात, हे शोएबने काही उदाहरणांद्वारे पटवून दिलं.

“जावेद भाईचा सिक्स लक्षात आहे. माझी कोलकातामधील विकेट लक्षात आहे. चॅम्पिन्स ट्रॉफी लक्षात राहिल, 2009 चा वर्ल्ड कप लक्षात राहिल. चाहते तुमची वैयक्तिक विक्रमी खेळी नाही, तर टीमसाठी केलेली मॅचविनिंग खेळी लक्षात ठेवतात. आज एकमेकांसाठी खेळा, पाकिस्तानसाठी खेळा. सारा पाकिस्तान तुमच्याकडे पाहतोय. मी तुमच्यासोबत आहे, जिंका, लढून खेळा”, असं शोएब अख्तरने म्हटलंय.

शोएब अख्तरचा पाकिस्तान टीमला संदेश

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

टी 20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान टीम : बाबर आझम (कॅप्टन), अबरार अहमद, आजम खान, फखर जमान, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास अफरीदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद रिजवान, नसीम शाह, सईम अयूब, शादाब खान, शाहीन शाह अफ्रीदी आणि उस्मान खान.