IND vs SA : जसप्रीत बुमराहकडून टेम्बाला भर मैदानात शिवीगाळ? पाहा व्हायरल व्हीडिओ

Jasprit Bumrah On Temba Bavuma Mic Stump : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने याने इडन गार्डन्समधील पहिल्या कसोटीत टेम्बा बावुमाला असं काय म्हटलं? पाहा व्हीडिओ.

IND vs SA : जसप्रीत बुमराहकडून टेम्बाला भर मैदानात शिवीगाळ? पाहा व्हायरल व्हीडिओ
Jasprit Bumrah On Temba Bavuma Mic Stump Video
Image Credit source: PTI and Social Media
| Updated on: Nov 14, 2025 | 2:00 PM

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी अप्रतिम सुरुवात केली. भारताचा वेगवान आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याने इडन गार्डन्समध्ये टॉस जिंकून बॅटिंगला आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या सलामी जोडीला दणका दिला. बुमराहने सलग 2 ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या सलामी जोडीला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. बुमराहने सामन्यातील 11 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर रायन रिकेल्टन याला आऊट केलं. त्यानंतर जसप्रीतने 13 व्या षटकांत एडन मारक्रमला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

दक्षिण आफ्रिकेने दुसरी विकेट गमावल्यानंतर कॅप्टन टेम्बा बावुमा वियान मुल्डर याची साथ देण्यासाठी मैदानात आला. या दोघांनी दक्षिण आफ्रिकेला सावरण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान जसप्रीत बुमराह याचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बुमराहने या व्हीडिओत टेम्बा बावुमाला शिवीगाळ केल्याचा दावा केला जात आहे. बुमराह टेम्बाला त्याच्यासमोर काही बोलला नाही. बुमराह आपल्या सहकाऱ्यांसह टेम्बाबाबत बोलताना त्याचे चॅट स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झाले.

बुमराहने 13 व्या ओव्हरमधील सहाव्या अर्थात शेवटच्या बॉलवर टेम्बा विरुद्ध एलबीडब्ल्यूची अपील केली. मात्र अंपायरने टेम्बा नॉट आऊट असल्याचं म्हटलं. त्यानंतर जसप्रीत बुमराह याने सहकाऱ्यांसह रीव्हीव्यू घेण्याबाबत चर्चा केली. तेव्हा जसप्रीतने बोलताना टेम्बाच्या उंचीबाबत भाष्य केलं. बुमराहने केलेली टिप्पणी स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झाली. बुमराहने टेम्बाला शिवी दिल्याचा दावा या व्हीडिओतून केला जात आहे. या मुद्द्यावरुन आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

बुमराह पहिल्या डावात ढेर

टेम्बा बावुमा टीम इंडिया विरुद्ध चौथ्या स्थानी बॅटिंगसाठी आला. मात्र टेम्बाला काही खास करता आलं नाही. टेम्बा 11 बॉलमध्ये 3 रन्स करुन आऊट झाला. कुलदीप यादवने टेम्बाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. कुलदीपने टेम्बाला लेग स्लिपवर असलेल्या ध्रुव जुरेलच्या हाती कॅच आऊट केलं. टेम्बा आऊट झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची 16 ओव्हरमध्ये 3 आऊट 71 अशी स्थिती झाली. भारताने त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला आणखी 2 झटके दिले आणि बॅकफुटवर टाकलं.

बुमराह टेम्बाबाबत काय म्हणाला?

कुलदीप यादव याने वियान मुल्डर याला एलबीडब्ल्यू आऊट करत दक्षिण आफ्रिकेला चौथा झटका दिला. वियान मुल्डर याने 51 बॉलमध्ये 24 धावा केल्या. तर जसप्रीत बुमराह याने टॉनी डी झॉर्जी याला एलबीडब्ल्यू आऊट केलं. टॉनीने 55 बॉलमध्ये 24 रन्स केल्या.