
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना हा रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा नियमित कर्णधार टेम्बा बवुमा याचं एकदिवसीय संघात कमबॅक झालं आहे. सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 1 वाजता टॉस झाला. पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. टेम्बाने फिल्डिंगचा निर्णय घेत भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. टीम इंडियाने प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिकेने 3 बदल केले आहेत.
दक्षिण आफ्रिकेने पराभवानंतर प्लेइंग ईलेव्हनमध्ये 3 बदल केले आहेत. टेम्बा बवुमा याचं कमबॅक झालं आहे. टेम्बाला पहिल्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे एडन मारक्रम याने नेतृत्व केलं होतं. तर टेम्बाच्या जागी रायन रिकेल्टन याला संधी देण्यात आली होती. आता टेम्बामुळे रायनला बाहेर व्हावं लागलं आहे.
तसेच ओटनील बार्टमॅन आणि प्रिनेलन सुब्रेन या दोघांनाही वगळण्यात आलं आहे. या दोघांच्या जागी लुंगी एन्गिडी आणि केशव महाराज यांचा समावेश करण्यात आला आहे.
कर्णधार बदलला असला तरी टॉसबाबत टीम इंडियाचं नशिब काही बदललं नाहीय. टीम इंडियाची ही सलग टॉस गमावण्याची 20 वी वेळ ठरली आहे. त्यामुळे टीम इंडियाची आणि चाहत्यांची टॉस जिंकण्याची प्रतिक्षा कायम आहे.
दरम्यान टीम इंडिया या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. तर दक्षिण आफ्रिकेसमोर मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात कोण मैदान मारतं याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
दक्षिण आफ्रिकेचा बॉलिंगचा निर्णय
🚨 Toss 🚨#TeamIndia have been put into bat first.
Updates ▶️ https://t.co/oBs0Ns6SqR#INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/d7YT7IVEu9
— BCCI (@BCCI) December 3, 2025
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि प्रसीध कृष्णा.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : क्विंटन डी कॉक(विकेटकीपर), एडन मार्कराम, टेम्बा बवुमा(कर्णधार), मॅथ्यू ब्रीट्झके, टॉनी डी झोर्झी, डेवाल्ड ब्रेविस, मार्को यान्सेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, नांद्रे बर्गर आणि लुंगी एन्गिडी